company robbery
company robbery 
उत्तर महाराष्ट्र

चोरट्यांनी तिजोरीच केली लंपास

सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव : ‘एमआयडीसी’तील एनटेक्स ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या होलसेल किराणा मालाच्या गोडावूनचे शटर उचकावून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ६ लाख २२ हजार ३७ रुपयांची रोकड असलेली तिजोरी लंपास केल्याची घटना शनिवारी (२५ जानेवारी) सायंकाळी ७.३० ते रविवारी (२६ जानेवारी) सकाळी ९.३० वाजेच्या दरम्यान घडली. चोरीच्या या घटनेमुळे ‘एमआयडी’त एकच खळबळ उडाली आहे. 
‘एमआयडीसी’मध्ये एनटेक्स ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी भूषण आर्य यांच्या गोडावूनमध्ये आहे. हे गोडावून आठ महिन्यांपासून सुरु असून ते दररोज सकाळी ५.३० ला उघडून सायंकाळी ७.३० ला बंद होते. कंपनीत किराणा माल असून कंपनीतील २० कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून तालुक्यातील किरकोळ विक्रेत्यांना पुरवठा केला जातो. त्यामुळे दररोज कंपनीत पैशांची देवाणघेवाण सुरू असते. जमा झालेला पैसा कंपनीत असलेल्या गोदरेजच्या तिजोरीत ठेवला जातो व दुसऱ्या दिवशी तो बँकेत जमा केला जातो. कंपनीचे गोडावून नेहमीप्रमाणे शनिवारी (२५ जानेवारी) सायंकाळी ७.३० वाजता बंद केले. रविवारी (२६ जानेवारी) सकाळी ९.३० ला कंपनीचा डबेवाला डबा देण्यासाठी आला असता, त्याला कंपनीचे शटर अर्धवट उघडे दिसले. त्याने ही माहिती कंपनीचा कामगार योगेश महाजन याला दिली. त्याने लगेचच कंपनीचे मॅनेजर पंकज माळी यांना कळविले. पंकज माळी यांनी शहर पोलिसात धाव घेऊन चोरीची फिर्याद दिली. ज्यात कंपनीतील गोदरेज तिजोरीतून ४ लाख ९३ हजार ३०० रुपये किंमतीच्या नोटा व १ लाख २८ हजार ७३७ रुपये किमतीची चिल्लर अशी सुमारे ६ लाख २२ हजार ३७ रुपयांची रोकड कंपनीच्या गोडावूनचे शटर उचकावून अज्ञात चोरट्यांनी तिजोरीसह चोरून नेले. या तक्रारीवरून शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT