उत्तर महाराष्ट्र

दुचाकीवरून विनाकारण फिरणे पडले महागात...१८ दुचाकी जप्त

सकाळवृत्तसेवा

चाळीसगाव ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या ‘लॉकडाऊन’ असतानाही शहरात दुचाकीवरून विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. शहर पोलिसांनी (३१ मार्च) पर्यंत अठरा दुचाकी जप्त केल्या आहेत. या सर्व दुचाकी आता न्यायालयाच्या आदेशानंतरच संबंधितांना मिळणार आहेत. विनाकारण शहरात फिरू नये, असे आवाहन पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी केले आहे. 

सध्या सर्वत्र संचारबंदी लागू केल्याने जीवनावश्‍यक वस्तूंचीच दुकाने उघडी ठेवण्याचे आदेश आहेत. काम असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मात्र, प्रत्यक्षात कारण नसतानाही विशेषतः सकाळी ९ ते ११ व सायंकाळी ५ ते ७ या वेळात बाहेर पडणाऱ्यांची संख्या अधिक आहे. इतकी गर्दी होते, की संचारबंदी लागू आहे, असे वाटतच नाही. 

नियमांची पायमल्ली 
दुकानांवर खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना ठराविक अंतर ठेवून उभे राहणे बंधनकारक आहे. शहरातील घाट रोडवरील काही किराणा दुकानांवर गर्दी होते. त्यामुळे ‘सोशल डिस्टेन्सिंग’चा फज्जा उडालेला असतो. ग्राहकच नियम पाळत नसल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे. तर वेळेची बचत व्हावी म्हणून घाई करावी लागत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. एकूणच या सर्व प्रकारात नियमांची पायमल्ली होत असतानाही कोणीही दखल घेत नसल्याचे वास्तव चित्र सध्या दिसून येत आहे. 

अठरा दुचाकी जप्त 
पोलिसांच्या वाहनासह पालिकेच्या घंटागाडीवरुनही नागरिकांना सध्याच्या काळात घरीच थांबण्याचे आवाहन सातत्याने केले जात आहे. असे असतानाही काही तरुण मुले तसेच नागरिक विनाकारण शहरात काय स्थिती आहे, हे पाहण्यासाठी कारण नसताना दुचाकीवरून फिरत असतात. यातील अनेकांना पोलिसांनी आपल्या दांड्यांचा प्रसादही दिलेला आहे. मात्र, अजूनही दुचाकीवरून विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नसल्याने याबाबत पोलिसांनी ठोस पावले उचलत जवळपास १८ दुचाकीस्वारांवर कारवाई केली. या सर्वांवर गुन्हे दाखल केले असल्याचे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी सांगितले. या सर्व दुचाकी सध्या पोलीस ठाण्यात जप्त केल्या असून न्यायालयाच्या आदेशानंतर त्या परत दिल्या जातील असे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर आमच्या कारवाया सुरूच राहणार आहेत. शहरात शहरात विनाकारण फिरताना आढळून आल्यास, त्याच्यावर नियमानुसार कारवाई करु. नागरिकांच्या भल्यासाठीच पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. 
- विजयकुमार ठाकूरवाड, पोलिस निरीक्षक ः चाळीसगाव 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'काँग्रेसने दोनदा बाबासाहेबांचा पराभव केला, प्रकाश आंबेडकरांना सोडून दिलं'; बावनकुळेंचा जोरदार प्रहार

Pune Loksabha Constituency : प्रांतिक तैलिक महासभेचा भाजपचे उमेदवार मोहोळ यांना पाठिंबा जाहीर

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : व्होट बँकेसाठी काँग्रेसने राम मंदिराचा अपमान केला - पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT