murder husband
murder husband 
उत्तर महाराष्ट्र

पत्नीशी अनैतिक संबंधाच्या संशायाचे भूत अन्‌ झाले असे 

सकाळ वृत्तसेवा

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) ः पत्नीचे दुसऱ्याशी असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने ट्रक चालक तरुणाचा डोक्‍यात लोखंडी पाईप टाकून खून केल्याची घटना दहिवद (ता. चाळीसगाव) येथे रविवारी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास घडली. 

दहिवद येथे घडलेल्या घटनेत वाल्मीक उर्फ जिभाऊ ओंकार जाधव (वय 25, रा. दहिवद) हा उसाच्या खासगी ट्रकवर चालक म्हणून काम करतो. तो रविवार (ता.26) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास सोनु मोबाईल दुकानाजवळ काही लोकांसह शेकोटीवर उभा असतांना मोटारसायकलवरून आलेल्या दादाभाऊ देवरे यांनी पाठीमागून गुपचून येत "तुन गच्ची हुयी गय...' असे सांगत वाल्मीकच्या डोक्‍यावर लोखंडी पाईपने जोरात वार केला. पहिला वार डोक्‍याला बसताच वाल्मीक जमिनीवर कोसळला. त्याचवेळी दादाभाऊ हा समाधानवर दुसरा वार करणार तोच मनोहर याने हातात पकडूल लोखंडी पाईप हिसकावून घेतला. गंभीर जखमी झालेल्या वाल्मीक जाधवला वाहनातून चाळीसगाव येथील खासगी दवाखान्यात दाखल केले असता डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषीत केले. 


संशयाचे भूत आणि केला खून 
संशयीत आरोपी दादाभाऊ पांडुरंग देवरे याच्या पत्नीचे वाल्मीकशी अनैतिक संबंध असल्याचा संशय दादाभाऊ याला होता. त्यातून दादाभाऊ व वाल्मीक यांच्यात वादही झाले आहेत. या संशयातूनच दादाभाऊने पत्नीस माहेरी पाठवून दिले होते. अनैतिक संबधांच्या संशयामुळे सुडाने पेटून उठलेल्या दादाभाऊने वाल्मीकला शेकोटीवर अंग शेकतांना बेसावधपणे गाठले व दोन लहान रॉड असलेला लोखंडी पाईप डोक्‍यात घातला. या एकाच घावाने वाल्मीक हा जमिनीवर कोसळला आणि त्याला उलट्या झाल्या. त्यानंतर तो बेशुद्ध झाला. मात्र उपचारासाठी चाळीसगावी नेले असता डॉक्‍टरांनी वाल्मीक हा मयत असल्याचे घोषीत केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Raver Lok Sabha Constituency : बालेकिल्ल्यात भाजप उमेदवाराला मताधिक्याची महाजनांची ‘गॅरंटी’

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

SCROLL FOR NEXT