live 
उत्तर महाराष्ट्र

घरोघरी गुढ्या, रोषणाई अन्‌ अंगणात रांगोळ्या...नारळाचा असाही सोहळा 

सकाळ वृत्तसेवा


नरकोळ : निताणे (ता. बागलाण) येथे निवृत्तिनाथ महाराज पदयात्रा उपक्रमांतर्गत फिरत्या नारळाचा कार्यक्रम उत्साहात झाला. यामुळे निताणेत भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. घरोघरी अंगणात काढलेल्या रांगोळ्या, रोषणाई, महाप्रसाद, गुढ्या उभारून केलेले स्वागत हे यंदाच्या फिरत्या नारळाचे वैशिष्ट्य ठरले. 
जायखेड्याचे (कै.) गुरुवर्य कृष्णाजी गुरुजींच्या मार्गदर्शनाने 49 वर्षांपासून अखंड सुरू असलेल्या या कार्यक्रमाला कसमादे पट्ट्यात प्रतिष्ठेचे मानले जाते. आगामी वर्षी या फिरत्या नारळाच्या कार्यक्रमाला 50 वर्षे पूर्ण होत असून, जायखेडा येथे कार्यक्रम होणार आहे.

महाप्रसाद आणि बरेच काही

यशोदाअक्का यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला. निताणेवासीयांनी केलेल्या नियोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला. दुपारी आचार्य हरिभाऊ महाराज भवाडे यांचे प्रवचन, माउलींचा रथ व पादुकांची मिरवणूक काढण्यात आली. रात्री वारकरीभूषण अनिल महाराज-पाटील (वार्शी) यांचे कीर्तन झाले. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. उत्तर महाराष्ट्रातील वारकरी, कसमादे पट्ट्यातील भाविक व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. 

नक्की वाचा- जळगावला महाआघाडीला शह

फिरत्या नारळाच्या ठळक घडामोडी 
-घरोघरी गुढ्या, अंगणात सडारांगोळ्या 
-आकर्षक रोषणाई 
-शालेय विद्यार्थ्यांची रथ मिरवणुकीत महत्त्वाची भूमिका 
-दिवंगत गुरुवर्य कृष्णाजी गुरुजींची रांगोळी लक्षवेधी 
-आकर्षक फुलांनी सजविलेला रथ 
-स्वतंत्र वाहनतळाची सोय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajnath Singh statement : 'जर पाकिस्तान अजूनही डंपर आहे, तर ते त्यांचे...' ; राजनाथ सिंह यांनी लगावला टोला!

Atal Setu Toll Free: वाहनधारकांसाठी खुशखबर! 'या' वाहनांना अटल सेतूवर टोल टॅक्स नाही, महायुती सरकारची मोठी घोषणा

Maharashtra Latest News Live Update : विटा शहरात डंपरने महिलेला चिरडले

अखेर गोविंदा पत्नीपासून वेगळा होणार, सुनीताने वांद्रे कोर्टात दाखल केला घटस्फोटाचा अर्ज; कोणकोणते आरोप केले?

Ganesh Chaturthi 2025 : 'या' गणेश चतुर्थीला एक-दोन नाही तर बनत आहेत 5 महायोग; या राशींवर बाप्पा होणार खुश

SCROLL FOR NEXT