live
live 
उत्तर महाराष्ट्र

केंद्र- राज्य सरकारविरोधात कॉंग्रेसचे उद्या देशव्यापी आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक ः राज्यातील भाजप शिवसेना यांच्यातील सत्तासंघर्ष तीव्र झाला असून जनतेच्या ज्वलंत प्रश्‍नाकडे त्यांचे लक्ष नाही. देश चालविण्याची या लोकांची क्षमताच नसल्यामुळे आज अर्थव्यवस्था तळाला पोहोचली आहे. आर्थिक विकासदर प्रतीदिनी घटतच असून सर्वसामान्यांचे जगणे अवघड बनले आहे, याकडे जनतेचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे उद्या (ता.8) देशव्यापी धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. नाशकातही कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 11 ते 2 दरम्यान धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. 

भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीला जनतेने स्पष्ट कौल देऊनही या दोन्ही पक्षांमधील समासमान सत्तेचा वाद टोकाला पोहोचला असल्याने राज्यात अद्यापही नवे सरकार सत्तेवर येऊ शकलेले नाही, त्यापार्श्‍वभूमीवर आज कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी शहरात पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भुमिका विषद केली. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, शहराध्यक्ष शरद आहेर, माजी मंत्री शोभा बच्छाव, प्रदेश चिटणीस डॉ. हेमलता पाटील, मध्य विधानसभा अध्यक्ष बबलू खैरे, महिला शहराध्यक्ष वत्सला खैरे, हनीफ बशीर यांच्यासह विविध सेलचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT