live 
उत्तर महाराष्ट्र

साहेब गाय बेपत्ता झाली,,,तुम्हीच सांगा शोधू कुठे.....

युनूस शेख,सकाळ वृ्त्तसेवा

जुने नाशिक-  साहेब माझी गाय बेपत्ता झाली.... कुणी तरी बांधून ठेवलंय तिला, आता तुम्हीच सांगा तिला मी शोधू कुठे...तुम्ही तरी तिचा शोध घ्या अशी याचना शिवानंद थहेकर यांनी भद्रकाली पोलिसाना करत आपला तक्रार अर्ज दाखल केला.. पण आता ही तक्रार कुठल्या कायद्याअंतर्गत घ्यायची बाबत काही वेळ पोलिसानाही प्रश्‍न पडला होता. 

तिच्या शोधासाठी खर्च करण्यास तयार

   सद्याच्या युगात आई वडीलाना उघड्यावर सोडणारी मुले  आपल्या सभोवती पहायला मिळतात. दुसरीकडे आपली गोमाता बेपत्ता झाल्याने कासावीस झालेले. तसेच तीच्या शोधात रस्तेन्‌ रस्ते फिरत आखेर पोलिस ठाण्याचा उबरटा चढणारे. एवढेच नाही, तर तीच्या शोधासाठी खर्च आला तरी चालेले परंतु तीचा शोध लागला पाहिजे. अशी भावनिक साद घालणारा व्यक्ती आजच्या युगात बघण्यास मिळणे. म्हणजे मोठे आश्‍चर्यच म्हणावे लागेल.

देवाच्या चरणी अर्पण, पण लक्ष नियमित

     शिवानंद थहेकर यांनी काही महिन्यांपूर्वी एक गाय देवाच्या चरणी सोडून दिली होती. असे असले तरी त्यांच्याकडून गोमातेची नेहमी काळजी घेत तीची माहिती ठेवली जात होती. गोमाताही कन्नमार पुल भागातील श्री. मिनानाथ समाधी मंदिर परिसरात फिरत असे. परंतु गेल्या काही दिवसांपासून ती नजरेस पडली नसल्याने शिवानंद अत्यंत दुखी झाले. त्यानी सर्वत्र तीचा शोध घेण्यास सुरुवात केली. द्वारका, काठेगल्ली, कन्नमार पुल, टाकळीरोड, तपोवनमधील गोशाळा अशा विविध ठिकाणी त्यानी गोमातेचा शोध घेतला. गोमाता मिळून आली नाही. शेवटी त्यानी शुक्रवार (ता.22) रोजी भद्रकाली पोलिस ठाणे गाठले. गेल्या अनेक दिवसापासून आम्ही देवाला सोडलेली गोमाता मिळत नाही. ती बेपत्ता झाली आहे. तीचा शोध घेण्यासाठी मी वाटेल ते करेल फक्त तिचा शोध पोलिसानी घ्यावा. असी आर्थ हाक त्यानी दिली.  

पत्रकांची छपाई 
एका मुक्‍या प्राण्याच्या प्रती शिवानंद थहेकर यांचा आटापिटा आजच्या असंवेधनशील समाजाला एक आदर्श ठरणारा आहे. त्यानी त्यांच्या बेपत्ता झालेल्या गोमातेची शोधासाठी केवळ पोलिसात तक्रार केली. असे नाही, तर त्यांच्याकडून पत्रकांची छपाईही केली जात आहे. ठिक-ठिकाणी ते पत्रके चिटकवून तसेच नागरीकाना देवून गोमातेचा शोध घेण्यास मदत करण्याचे आवाहन करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates : हिंदीविरोधातील स्टॅलिन यांच्या लढ्याला आमच्या शुभेच्छा - संजय राऊत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT