corona  
उत्तर महाराष्ट्र

खानदेशातही निजामुद्दीन "कनेक्‍शन' 

अमोल कासार

जळगाव : राजधानी दिल्लीतील निजामुद्दीन येथील "तबलीग जमात'च्या आंतरराष्ट्रीय संमेलनात जळगाव जिल्ह्यातील 13 तर धुळे जिल्ह्यातून 7 जण सहभागी झाले होते. पंधरा दिवसांपूर्वीच सर्व जण घरी परतल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा प्रशासनाला याची माहिती प्राप्त झाल्यावर त्या सर्वांची माहिती संकलित करून त्यांच्या यापूर्वीच तपासण्या झाल्या. त्यापैकी एकही जण "पॉझिटिव्ह' नाही, अशी अधिकृत माहिती प्राप्त झाली आहे. 
दिल्ली येथील "तबलीग जमात'च्या संमेलनासाठी जिल्ह्यातून 13 जण सहभागी झाले असल्याची माहिती दिल्लीतून प्राप्त झाल्यावर जिल्ह्याची यंत्रणा सकाळपासून या लोकांच्या शोधात होती. त्यातील सर्वांची नावे निष्पन्न झाली असून, त्यापैकी कोणीही "पॉझिटिव्ह' नसल्याची अधिकृत माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. 

असे आहेत तेरा जण 
जळगाव - 2, भुसावळ- 3, चोपडा- 1 एरंडोल- 1, यावल- 2, पाचोरा (लोहारा)- 1, अमळनेर (हिंगोणे)- 1, धरणगाव- 1, चाळीसगाव- 1 अशी माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाल्यानुसार संबंधितांचा तपास लावण्यात आला. चौकशीत या 13 जणांपैकी 2 जण दिल्ली येथेच असून ते तेथे नोकरीला आहेत तर दोन जण नाशिक येथे गेले आहेत. भुसावळ शहरात 2 जण आहे. जळगाव शहरातील 2 जण असून, या सर्वांची वैद्यकीय तपासणी झाली आहे. कोणालाही "कोरोना'ची लागण झालेली नसल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. नाशिक व भुसावळ येथील लोकांनीही वैद्यकीय तपासणी झालेली आहे. 

...म्हणून झाला उशीर 
जिल्हा व पोलिस प्रशासनाला प्राप्त तेरा जणांच्या यादीतील काहींचे मोबाईल क्रमांक चुकीचे असल्याने सर्वांची माहिती संकलित करून खात्री करण्यासाठी कसरत करावी लागली. खूप मेहनत घेतल्यावर खात्रीशीर माहिती हाती आल्याचे प्रशासनाने कळविले. आलेल्या यादीतील सर्वच्या सर्व लोक बारा ते पंधरा दिवसांपूर्वीच त्यांच्या घरोघरी पोचल्याचीही माहिती प्राप्त झाली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT