उत्तर महाराष्ट्र

अतिदुर्गम भागातील काल्लेखेतपाडा शाळेची जागतिक शाळांमध्ये निवड 

धनराज माळी

धडगाव ः नुकत्याच झालेल्या सहा खंडातील हजारो शाळांमधून जगातील शंभर शाळांमध्ये महाराष्ट्रातील काल्लेखेत (ता. धडगाव) जिल्‍हा परिषद शाळेला सहभागी होण्याचा बहुमान मिळाला. उद्याचे ‘भविष्य इथे किलबिलते’ हे ब्रीदवाक्य घेऊन २००१ मध्ये तेगा पावरा यांच्या वस्तीशाळेचे २००९ मध्ये प्राथमिक शाळेत रूपांतर झाले. आणि या परिसरातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवनमान उंचावले. आज हीच शाळा शैक्षणिक गुणवत्तेचा जोरावर जागतिक शाळामध्ये संवादासाठी सहभागी झाली आहे. 

या शाळेत सुरवातील शिक्षक रुपेशकुमार नागलगावे यांना मुख्याध्यापक म्हणून संधी मिळाली. फक्त १४ विद्यार्थीवरून आज शाळेत विद्यार्थी पटसंख्या १४० झाली आहे. आज शाळेचे नाव जागतिक पातळीवर पोचल्यामुळे गाव स्तरावर काल्लेखेत शाळेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. काल्लेखेतपाडा येथे १२ पाड्यावरची १४० मुले दररोज सरासरी ४ किलोमीटर चालत शाळेत येतात. आठ ऑक्टोबरला जागतिक शिक्षण संवाद सत्र म्हणजे ‘ग्लोबल एज्युकेशन वीक’च्या कार्यक्रमात जगातल्या १०० शाळांमध्ये या शाळेला चर्चासत्रात भाग घेण्याची संधी मिळाली आहे. 


शाळेच्या सादरीकरण कार्यक्रमात स्पीकर म्हणून मुख्याध्यापक रुपेश नागलगावे, लक्ष्मीपुत्र उप्पीन (सहशिक्षक), तेगा पावरा, चेतन पावरा, मोगी पावरा, मनीषा पावरा, राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी सहभाग घेतला. ग्यानप्रकाश फाउंडेशनच्या पल्लवी यांनी सूत्रसंचालन व इंग्रजी भाषांतर करून जागतिक प्रेक्षकांसाठी सेतू म्हणून काम केले. 

संपादन- भूषण श्रीखंडे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election : गोकुळ निवडणुकीत महायुतीत मिठाचा खडा? मुश्रीफांच्या 3500 ठरावांच्या दाव्यावर महाडिकांचा कडाडून सवाल, 'त्या' आकडेवारीमागचा उद्देश काय?

सकाळी जाग येताच नोकरी गेल्याचे मेल; Oracleमध्ये पुन्हा कर्मचारी कपात

Gram Panchayat Election : दिवाळीनंतर ग्रामपंचायत निवडणुकांचा वाजणार बिगुल? SIR ने वाढवली इच्छुकांची धाकधूक, नव्या कारभाऱ्यांसाठी करावी लागणार प्रतीक्षा!

Latest Marathi News Update : धनुष्यबाण राहणार की जाणार? शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सुनावणी

Gokul Election : 'गोकुळ'वरून कोल्हापुरात राजकीय वातावरण तापलं! मुश्रीफांकडून आकडेवारी, इशारा कुणाला?; 'तुमची गरज नाही' असा अप्रत्यक्ष दिला संदेश

SCROLL FOR NEXT