उत्तर महाराष्ट्र

"मॉर्निंग वॉक' पडले महागात...धुळ्यात 22 प्रतिष्ठितांविरूध्द गुन्हा 

सकाळवृत्तसेवा

धुळे  : संसर्गजन्य "कोरोना व्हायरस'चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यासह जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. त्याकडे दुर्लक्ष करत येथील काही प्रतिष्ठित नागरिक शहरात विविध भागात "मॉर्निंग वॉक' करत होते. त्यामुळे संचारबंदीच्या उल्लंघन प्रकरणी 22 प्रतिष्ठितांविरूध्द शहर पोलिस ठाण्यात आज गुन्हा दाखल झाला. यात डॉक्‍टरांसह वकील, राजकीय मंडळींचा समावेश आहे. 

या प्रकरणी शहर पोलिस ठाण्याचे नाईक प्रल्हाद वाघ, राजू वसावे, मनोहर ठाकूर आदींनी फिर्याद दिली. गर्दी टाळणे, अनावश्‍यक घराबाहेर पडणे टाळणे आदी प्रकारच्या सूचना असताना 22 प्रतिष्ठितांनी संचारबंदीचे उल्लंघन करत "मॉर्निंग वॉक' केल्याने त्यांना या कारवाईला सामोरे जावे लागले. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. ते शहरातील शिवाजी रोडवरील कालिकामाता मंदीरासह शिवतीर्थ, गणपती मंदिर परिसरात सकाळी सहाला "मॉर्निंग वॉक' करत होते. या प्रकरणी शोध व कारवाईची मोहीम सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

22 प्रतिष्ठित असे 
गुन्हा दाखल झालेले प्रतिष्ठित असे ः विनोद हेमचंद चौधरी (वय 43, रा. नवभारत चौक, गल्ली नंबर 6), किशोर बाबूराव सैंदाणे (57, रा. सर्वोदय कॉलनी), संजय प्रकाश जगताप (38, रा. नटराज टॉकीजमागे महालक्ष्मी कॉलनी), शेखर सोमनाथ विभांडीक (39, रा. गल्ली नं.6), प्रल्हाद किसन कापडणेकर (61, रा. नित्यानंदनगर, प्लॉट न. 14- ब), विजय राधाकिसन वर्मा (60, रा. प्लॉट न. 40, अशोकनगर, जमनागिरी रोड), रहीमखान गुलशेर खान (51, रा. गल्ली नं. 6, एल. एम. सरदार हायस्कूल मागे), सत्यनारायण किशनलाल शर्मा (55, रा. मोहाडी जयशंकर कॉलनी), अशोक राजाराम अहिरे (50, रा. एसआरपी कॉलनी, नकाणे रोड), शिरीष बळिराम देवरे (38, रा. सुपडू अप्पा कॉलनी, जुने धुळे), गिरीश नथ्थू ब्रम्हे (50, रा. गल्ली नं. 6), रमेश पुंडलिक माईनकर (61, रा. शिवशक्ती कॉलनी, चितोड रोड), गजानन पुंडलिक पाटील (43, रा. विकास कॉलनी, साक्री रोड), मनोज दादासाहेब मोरे (47, रा. सर्वोदय कॉलनी, न्यू सिटी हायस्कूल मागे), अनिल शरद वाल्हे (42, 
रा. मोगलाई, साक्री रोड), मोनाली मधुर जैन (41), रेखा सुनील पोतदार (60), सुनील दगडू पोतदार (60), धीरेन योगेंद्र शहा (53), नानासाहेब यादव चौधरी (60), पियुष प्रेमचंद्र बाफना (27), घनश्‍याम आधार पाटील 
(45). पोलिस ठाण्याचे निरीक्षक हेमंत पाटील, सहायक निरीक्षक दादाभाई पाटील, श्रीकांत पाटील, एस. पी. तिगोटे, उपनिरीक्षक व्ही. पी. पवार, सहायक उपनिरीक्षक के. व्ही. सोनवणे, हवालदार बी. सी. पाटील, राजू वसावे, प्रल्हाद वाघ, मुक्‍तार मन्सुरी, राहुल पाटील, मनोहर ठाकूर, अविनाश कराड, तुषार मोरे, मनीष सोनगीरे, शकीर शेख, एस. बी. पगारे यांनी केली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अजितदादांच्या निधनानंतर निधीची जुळवाजुळव करताना CM फडणवीसांची दमछाक; शासकीय खर्चासाठी आता नवी नियमावली

अब्जावधी डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेच्या गप्पा, पण पायाभूत सुविधा कुठे?” ; Mumbai–Pune Expressway वरील ट्रॅफिकमुळे युवती संतप्त

Latest Marathi News Live Update : लोकसभेचं कामकाज आजही विस्कळीत

World Cancer Day 2026: मधुमेह, लठ्ठपणामुळेही कर्करोगाचा धोका! तज्ज्ञांचा इशारा; जागतिक कर्करोग दिनानिमित्त लवकर निदानावर भर

New Cricket Laws : विकेट घेतली, तरी ओव्हर पूर्ण करावीच लागणार; MCC कडून नवे क्रिकेट नियम जाहीर; एकूण ७३ नियमांमध्ये केला बदल

SCROLL FOR NEXT