उत्तर महाराष्ट्र

कृषी दिनानिमित्त गावकऱ्यांनी केला आदर्श शेतकऱ्यांचा गौरव

दगाजी देवरे

म्हसदी : कृषी दिनानिमित्त (Agriculture Day) शेतात घाम गाळून, सोनं पिकवणाऱ्या तीन शेतकऱ्यांचा काळगाव (ता.साक्री) येथील ग्रामपंचायतीने (Gram Panchayat) आज सकाळी 'सरपंच कृषी गौरव' पुरस्कार ('Sarpanch Krishi Gaurav'award) प्रदान करत गौरव केला. काळ्या आईची सेवा करत शेतीत यश मिळवत इतर शेतकऱ्यांना (Farmers) प्रेरणा देणाऱ्या बळीराजाचे कृषीदिनी गौरव करणारी काळगाव ग्रामपंचायत एकमेव असावी.(agriculture day kalgaown gram panchayat sarpanch krishi gaurav award)


फळ, भाजीपाला उत्पादक नितीन ठाकरे, कांदा उत्पादक जगन ठाकरे व पशुधन सांभाळत फळ शेती करणारे आदिवासी शेतकरी लाला अहिरे यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान चिन्ह,प्रशिस्तपत्र, शाल, श्रीफळ देत गौरव करण्यात आला. तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष रावसाहेब ठाकरे अध्यक्षस्थानी होते.लोकनियुक्त सरपंच तथा कृषी भुषण संजय भामरे, उपसरपंच रावसाहेब खैरनार, नरेंद्र ठाकरे, जगदीश ठाकरे, भटू भामरे, यादवराव खैरनार, गंगाराम ब्राह्मणे, रमेश ब्राह्मणे, बाजीराव ठाकरे,आदर्श शेतकरी संदिप भामरे,कैलास अहिरराव (तामसवाडी), बबन खैरनार, नितीन ठाकरे, महेश ठाकरे, रावसाहेब ठाकरे, नंदू सोनवणे, सुखदेव सोनवणे, अशोक खैरनार, प्राथमिक शिक्षक शशिकांत पाटील,मंडळ कृषी अधिकारी पी.एल.भामरे, कृषी पर्यवेक्षक जे.एल.पवार, कृषी सहाय्यक आर.आर.बारसे, ग्रामसेवक आर.एल.वाघ उपस्थित होते.

कष्ट करणाऱ्यांचा गौरव..!
गावाची लोकसंख्या एक हजार 93 असून चारशे दहा हेक्टर महसूल क्षेत्र(शेत जमीन) आहे.1320 हेक्टर वनक्षेत्र आहे.सुमारे दोनशे शेतकरी कुटुंबे असून मुबलक पाण्यामुळे नव्वद टक्के बागायती शेती आहे.फळ,भाजीपाल्याची शेती करण्यात शेतक-यांचा हातखंडा आहे.आदिवासी (भिल्ल)समाज बांधवाकडेही शेती असल्याने तेही फळशेती करत असल्याचा आदर्श आहे.जेष्ठ आदिवासी शेतकरी लाला अहिरे यांच्याकडे गावरान गाई आणि शेळ्या आहेत.केवळ एका गाईपासूनच्या उत्पतीत गावात सर्वाधिक गाई त्यांच्याकडे आहेत.प्रत्येक क्षेत्रातील यशस्वी शेतक-यांचा गौरव करत ग्रामपंचायतीने आदर्श पायंडा पाडला आहे.कष्ट करत शेती करणा-या गावातीलच शेतक-यांचा दरवर्षी गौरव करण्याचा ग्रामपंचायतीचा संकल्प असल्याचे सरपंच भामरे यांनी सांगितले.गावातील इतर शेतक-यांनी यातून प्रेरणा घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.पुरस्कार प्राप्त शेतकरी नितीन ठाकरे,मंडळ कृषी अधिकारी भामरे,यादवराव खैरनार,तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष ठाकरे आदींनी मनोगत व्यक्त केले.मुख्याध्यापक विजय भामरे यांनी सुत्रसंचालन केले.सुरेश ब्राह्मणे,विजय सोनवणे,बाला ठाकरे,मधुकर भामरे,ज्ञानेश्वर खैरनार यांनी संयोजन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT