murder  
उत्तर महाराष्ट्र

आईला बोलला अपशब्द; बापाने मुलालाच जीवे मारले

सकाळ वृत्तसेवा

धुळे : इंदवे (ता. साक्री) येथील गावातील नवीन घराचा दुसरा मजला पाहिजे, या कारणावरून मुलाने आपल्याच आईला अश्‍लील शब्द उच्चारून शिवीगाळ केली. त्याचा राग मनात ठेवून बापानेच मुलाच्या डोक्‍यात बांधकामाची लाकडी फळी मारून ठार मारल्याची घटना घडली. 

इंदवे (ता. साक्री) येथे शनिवारी (ता. 21) सकाळी अकराला योगेश देविदास वाघ (वय 40) याने नवीन घराचा दुसरा मजला पाहिजे. म्हणून आई मथुराबाईला अश्‍लील शब्द उच्चारून शिवीगाळ केली. यामुळे संतप्त झालेल्या योगेशचे वडील देविदास सीताराम वाघ यांनी योगेशच्या डोक्‍यावर बांधकामाची लाकडी फळी मारली. यात योगेशचा जागीच मृत्यू झाला. सुरवातीला देविदास वाघ व कुटुंबाने नवीन बांधकाम चालू असलेल्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने योगेशचा मृत्यू झाल्याचा बनाव रचला. घटनास्थळी पडलेल्या रक्‍तावर शेण टाकून पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. 
या प्रकरणी पोलिसपाटील संतोष पाटील यांना वाघ कुटुंबीयांनी खोटी माहिती दिली. तसेच खरी माहिती उजेडात आल्यांनतर पोलिसपाटील संतोष पाटील यांनी निजामजूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी संशयित देविदास वाघला अटक केली असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. के. शिरसाट तपास करीत आहेत. 

शेण टाकून पुरावे केले नष्ट 
कुटुंबीयांनी मुलाचा घराच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याचा बनाव केला. तसेच पडलेल्या रक्‍तावर शेण टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी निजामपूर पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी संशयिताला अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके भारतात येणार! दिल्लीत आंदोलन करत शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागणार, व्हिडिओतून तारीख सांगितली

RCB ट्रॉफी जिंकल्यावर विराट कोहलीच्या वैभव सूर्यवंशीसोबत रंगल्या गप्पा; Video होतोय तुफान Viral

ओटीपोटावरची चरबी घालवायला जास्त व्यायाम करताय? तापसी पन्नूने केलेली चूक तुम्ही करू नका; अभिनेत्री म्हणाली, 'मी बारीक होण्यासाठी...'

Faluda City: उन्हाळ्यातील सर्वात लोकप्रिय डिश 'फालुदा' मूळची भारतीय नाहीच? मुघलांसोबत आलेल्या 'फालुदेह'ची रंजक कहाणी

Baramati Theft : चोरी बारा लाखांची..... गुन्हा मात्र पावणेदोन लाखांचा दाखल; पोलिसांच्या अजब कारभाराची चर्चा

SCROLL FOR NEXT