corona positive 
उत्तर महाराष्ट्र

"तो' मृत व्यक्ती साक्रीतून बाहेर पडलाच नाही... 

सकाळ वृत्तसेवा

धुळे : जिल्ह्यातील साक्री शहरामधील पहिल्या 53 वर्षीय कोरोनाग्रस्त व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तो नवी दिल्लीतील निजामुद्दीन भागात मरकजला, सुनेला आणण्यासाठी कल्याण, तसेच मालेगावला जाऊन परतल्याची विविधांगी चर्चा होत आहे. प्रत्यक्षात महिन्यापासून तो साक्री शहर आणि तालुक्‍यातील काही गावेवगळता बाहेर पडलेलाच नाही. मग तो "कोरोनाग्रस्त' झाला कसा, असा प्रश्‍न आहे. ते जाणण्याचे सरकारी यंत्रणेपुढे आव्हान आहे. त्या दिशेने कंबर कसली जात आहे. 

जिल्ह्यात परवापर्यंत कोरोनाग्रस्त रुग्ण नव्हता. मात्र, शुक्रवारी (ता. 10) साक्रीत पहिला रुग्ण आढळला. अनेकांना धुळे शहराबाबत धाकधूक होती. मात्र, साक्रीतून "कोरोना'चा उगम झाल्याने पोलिस आणि महसूल यंत्रणा हादरली. लागलीच विविध उपाययोजना राबविण्यास सुरवात झाली. त्याचबरोबर मृत कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची शोधाशोध सुरू झाली आहे. त्याच्या कुटुंबीयांनाही वैद्यकीय तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. 
 
माहिती लपविली जातेय? 
साक्रीत "कोरोना' पोहोचलाच कसा हे कोडे प्रत्येकाला पडले आहे. पोलिस व महसूल यंत्रणेच्या तपासात संबंधित 53 वर्षीय बांधकाम मिस्त्री साधारणतः महिन्यापासून साक्री शहर किंवा तालुक्‍यातील काही गावेवगळता बाहेर पडलेला नाही. त्यामुळे तो आधीच कुणातरी कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आला असावा, "कम्युनिटी स्प्रेड' किंवा तो व त्याचे कुटुंबीय "ट्रव्हलिंग हिस्ट्री', आवश्‍यक ती माहिती लपवत असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. या शोधात पोलिस व महसूल यंत्रणा गुंतली आहे. मृत कोरोनाग्रस्त व्यक्ती व त्याच्या कुटुंबीयांतील प्रत्येक व्यक्ती, नातेवाइकाची माहिती घेणे, त्यातून कुणाचा कसा कुठे संपर्क आला याची तपासणी केली जात आहे. त्याशिवाय यंत्रणेला गत्यंतर, पर्याय उरलेला नाही. अन्यथा, धोका वाढण्याची शक्‍यता असेल. 

"ते' तपासणीच्या कचाट्यात 
मृत कोरोनाग्रस्त व्यक्तीने साक्रीत तीन डॉक्‍टरांकडे उपचार घेतले. त्याला किडनीचा आजार होता. त्याला निमोनियाही नव्हता. त्यात त्याने प्रमाणापेक्षा अधिक ताक प्यायले व अंडेही खाल्ले. नंतर त्याची प्रकृती अधिक बिघडली. त्याला साक्रीतील एका डॉक्‍टरने धुळ्यात जाण्याचा सल्ला दिला. मग येथील एका खासगी हॉस्पिटलने जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. तो 8 एप्रिलला सायंकाळी सव्वापाचला रुग्णालयात दाखल झाला. त्याचा गुरुवारी मध्यरात्रीनंतर दीडला मृत्यू झाला. नंतर तो "कोरोना पॉझिटिव्ह' असल्याचा अहवाल प्राप्त झाला. या कालावधीत त्याचा संपर्क आलेल्या सर्व व्यक्ती तपासणीच्या कचाट्यात आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: संजू सॅमसनचे शतक अन् CSK ची मुंबईत घुसून दादागिरी! आयपीएलमधील सर्वात मोठा विजय, गुणतालिकेत मोठी उलथापालथ

Video Viral : येडे गबाळे! PSL च्या टॉसच्या वेळेस मारामारी, डेव्हिड वॉर्नरला काय चाललंय कळेना... हसावं की पळावं? झाला कन्फ्युज...

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली मोठा गैरव्यवहार! महिलांकडून वसुली पूर्ण, पण पुरुषांवर निर्णय प्रलंबित का?

West Bengal Voting : स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच पश्चिम बंगाल-तामिळनाडूत विक्रमी मतदान, निवडणूक आयोगाचा मतदारांना सलाम

Sanju Samson Century: १० चौकार, ६ षटकार! संजूच्या शतकाने मोडले अनेक विक्रम; रोहित शर्माशी बरोबरी, गिलख्रिस्टवर पडला भारी

SCROLL FOR NEXT