fir 
उत्तर महाराष्ट्र

जिल्ह्यात दुकाने उघडे ठेवल्याने गुन्हे दाखल 

बी. एम. पाटील

धुळे : "कोरोना' विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रथम जमावबंदी, नंतर संचारबंदीचा आदेश लागू झाला. असे असताना अत्यावश्‍यक सेवा वगळता आठ ते दहा व्यावसायिकांनी आपापली दुकाने सुरू ठेवली. मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला आणि पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत इतर व्यावसायिकांना योग्य तो इशारा दिला. 
सरकारने दवाखाने, रुग्णालये, मेडिकल दुकान, किराणा दुकान, भाजीपाला व दूध विक्री आदी अत्यावश्‍यक सेवा वगळून इतर प्रकारच्या विक्रेत्यांना "बंदी' घातली आहे. यामागे गर्दी टळून संसर्ग पसरणार नाही, असा उद्देश आहे. तरीही काही दुकानदारांनी आदेशाचे पालनच केले नाही. त्यात पोलिसांनी आज (मंगळवारी) सकाळी शहरातील पाचकंदील, आग्रा रोड परिसर, पारोळा रोड, आझादनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत व्यावसायिक, विक्रेत्यांविरूध्द थेट गुन्हे दाखल केले. त्यामुळे व्यावसायिक, दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत. 
आग्रा रोडवरील चहा विक्रेता कैलास हटकर, शेरे पंजाब हॉटेलजवळ राजेश शांतिलाल अग्रवाल, पारख लॉजजवळ मोबाईल दुकानदार सूरज भगवान अपूर्बा, ऐंशी फुटी रोडवरील शिवकुटीयाजवळ नाश्‍ता सेंटरचालक शंभू मोहन लहामगे, पारोळा रोडवरील ज्योतिष कार्यालय सुरू ठेवणारा बाबूलाल प्रभुदयाल शर्मा, कृषी बाजार समितीजवळील सलून व्यावसायिक मालक महेश उत्तम महाले यांच्यावर ही कारवाई झाली. त्यांनी दुकान सुरू ठेवल्याने गर्दी होती. 

नरडाणा पोलिसांकडून कारवाई 
नरडाणासह (ता. शिंदखेडा) इलेक्‍ट्रीक दुकानदार अनिल शांतिलाल जैन (रा. बेटावद), रसवंती चालक समाधान मधुकर पाटील (रा. वारूड), स्वीट सेंटर विक्रेता प्रमोद मुरलीधर बोरसे (रा. नरडाणा) यांनी बंदी आदेशाचे उल्लंघन करून आपली दुकाने सुरू ठेवली. त्यांच्याविरुद्ध नरडाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

BRICS Summit Food: सत्तू, मखाना अन् काश्मिरी पदार्थ... ब्रिक्स परिषदेतले शाही मेन्यू कोणते? नॉनव्हेज आहे का?

Latest Marathi News Live Update : शिंदेसेनेच्या आमदाराच्या मुलाला अटक, कारण काय?

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

SCROLL FOR NEXT