cctv 
उत्तर महाराष्ट्र

बाप्पाच्या निरोपावेळी सीसीटीव्हीचा वॉच, स्वच्छतेसाठी पथके; धुळ्यात कसे आहे नियोजन पहा 

सकाळ वृत्तसेवा

धुळे : गणेश विसर्जनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. तसेच महापालिकेने विविध भागातील मुख्य चौक व मार्गांवर सार्वजनिक स्वच्छतेसाठी पथकेही नियुक्त केली आहेत. 
विसर्जनाच्या अनुषंगाने धुळे महापालिकेने तयारी पूर्ण केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी विसर्जन मिरवणुकांवर तसेच नदीपात्रात मूर्ती विसर्जनावर बंदी घातली आहे. मूर्ती विसर्जनासाठी महापालिकेने शहरात ३७ ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. या ठिकाणी महापालिकेने विद्युत व्यवस्था व कर्मचारी पथके नियुक्त केली आहेत. प्रभागनिहाय १९ अधिकारी व कर्मचाऱ्यांची समन्वयक म्हणून नियुक्‍ती केली आहे. तसेच संबंधित ३७ ठिकाणी स्वच्छता निरीक्षक व त्यांच्या नियंत्रणात प्रत्येकी तीन स्वच्छता कर्मचारी सकाळी नऊ ते रात्री दहादरम्यान उपस्थित असतील. संकलित होणाऱ्या गणेशमूर्तीच्या वाहतुकीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या २० मालवाहतूक बस सज्ज ठेवल्या आहेत. मालवाहतूक बस सजवून व स्वच्छ करून वापरण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त निर्माल्य संकलनासाठी महापालिकेच्या ३७ घंटागाड्या असतील. अत्यावश्यक प्रसंगी अतिरिक्त पाच माल वाहतूक बस उपलब्ध आहेत. 

सीसीटीव्हीद्वारे नजर 
प्रत्येक मूर्ती संकलन केंद्राच्या ठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. शहरातील विविध भागात व मुख्य चौक व मार्गावर सार्वजनिक स्वच्छतेसाठी महापालिकेचे पथक असेल. दरम्यान, पोलिसांच्या सूचनेप्रमाणे शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी महापालिकेने सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. सर्व घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्तींचे संकलन करून तसेच मूर्तीचे पावित्र्य राखून, पूजा करून त्या विसर्जित करण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी गणेशमूर्ती, निर्माल्य प्रशासनाने निश्‍चित केलेल्या ठिकाणीच दान करावे, अनावश्यक गर्दी टाळावी व कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: आठ आस्थापनांवर 'एफडीए'चा बडगा, पाच परवाने निलंबित; अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन

Sharad Koli : ठाकरे गटाला मोठा धक्का! शरद कोळी 1 वर्षासाठी येरवाड्यात; नेमकं प्रकरण काय?

डोंबिवली सोडली, जिद्दीने गोरेगावला घेतलेलं घर; आता तेजश्री प्रधानवर आली तोही फ्लॅट सोडायची वेळ, नेमकं काय घडलं?

भांडकुदळ की स्पष्टवक्ते? समोर बॉस असो की नेता; थेट भिडतात 'या' मूलांकाचे लोक!  अंकशास्त्रानुसार जाणून घ्या बेधडक स्वभावाचे रहस्य...

Marathi News Live Updates: पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत बंडखोरी राष्ट्रवादीचे शिवाजी खांडेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

SCROLL FOR NEXT