उत्तर महाराष्ट्र

धुळे सायकलिस्टच्या १२ सायकलस्वारांनी सहाशे किमी अंतर कापले ४० तासांत 

रमाकांत घोडराज

धुळे : धुळे- ठिकरी (मध्य प्रदेश)- धुळे- नाशिक- धुळे अशा तब्बल सहाशे किलोमीटरचे अंतर ४० तासांत पूर्ण करण्याची कामगिरी १२ सायकलस्वारांनी केली. या सायकलस्वारांचा येथे सत्कार करण्यात आला. चांगल्या आरोग्यासाठी सायकलचा वापर, असा संदेश या स्पर्धेतून देण्यात आला. 


फ्रान्समधील ऑडॅक्स सायकलिंग क्लबशी संलग्न धुळे सायकलिस्टतर्फे ६०० किलोमीटर अंतराची स्पर्धा नुकतीच झाली. धुळे-ठिकरी (मध्य प्रदेश)- धुळे- नाशिक- धुळे असे या स्पर्धेचे अंतर होते. हे ६०० किलोमीटरचे अंतर स्पर्धकांना ४० तासांत पूर्ण करावयाचे होते. यात एकूण अठरा सायकलस्वारांनी सहभाग नोंदविला. यातील १२ सायकलस्वारांनी हे अंतर निर्धारित वेळेआधीच पूर्ण केले.

मोहिमेत यांचा होता समावेश

यात संभाजी पाटील, विद्याधर इंगळे, वीरेंद्र फिरके (जळगाव), ललित ऊर्फ टोनी पंजाबी, अरुण महाजन (चाळीसगाव), प्रवीण फालक, गनसिंग पाटील (भुसावळ), पुरुषोत्तम मोरे, रामदास सोनवणे, मुस्तफा टोपीवाला, गणेश कुंवर (नाशिक) यांचा समावेश होता.

यशस्वी सायकलस्वारांचे स्वागत

या सर्व यशस्वी सायकलस्वारांचे येथील गुरुद्वारा येथे स्वागत तथा सत्कार झाला. आर. सी. पटेल इंजिनिअरिंग कॉलेज (शिरपूर)चे प्राचार्य जयंतराव पाटील यांनी सत्कार केला. स्पर्धेसाठी धुळे सायकलिस्टच्या सदस्यांसह अनिल जाधव, प्रवीण माळी, शैलेंद्र चोरडिया, शरद पाटील आदींनी परिश्रम घेतले. स्पर्धेची तांत्रिक बाजू पराग पाटील आणि जे. बी. पाटील यांनी सांभाळली. दरम्यान, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुनील नाईक (धुळे) यांनी सहाशे किलोमीटर अंतर पूर्ण करताना चौथ्यांदा सुपर रेन्डोनर पुरस्कार प्राप्त केला. 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nalasopara Kalamb Beach Incident : नालासोपाऱ्यात कळंब समुद्रकिनारी रिल स्टार समुद्रात बुडून बेपत्ता; गणेश विसर्जनाचे व्हिडिओ बनवताना घडली दुर्दैवी घटना

Gold Rate Today: सप्टेंबरअखेर सोनं 11 हजारांनी स्वस्त! खरेदीदारांना दिलासा; मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात भाव किती?

Latest Marathi News Live Update : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल; २२ तासांपासून विसर्जन मिरवणूक, थोड्याच वेळात बाप्पाला निरोप

प्रेमानंद महाराजांच्या शिष्याने इमारतीवरून मारली उडी, प्रायव्हेट पार्ट कापलेला; वृंदावनात घटनेने खळबळ!

IPS Mohibullah Ansari : कोण आहेत मोहिबुल्लाह अंसारी? अमेरिकेत मिळणार ‘एशियन हिरो अवॉर्ड’; जाणून घ्या IPS अधिकाऱ्याचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT