Bhamne Accident 
उत्तर महाराष्ट्र

ऊजैनवरून परतणाऱ्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोन जणांचा मृत्यू

Dhule Accident News : दोंडाईचा-शिंदेखेडा रस्त्यावरील सात किलोमिटर अंतरावरील बाह्मणे गावाजवळ मध्यप्रदेश कडून उजैन येथून भावीकांची व्हॅन सुरतकडे जात होती.

सकाळ डिजिटल टीम

जळगाव - श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी उजैन (Ujain) येथे भगवान शंकाराचे दर्शन घेवून सुरतकडे (Surat) घरी परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला दोंडाईचा- शिंदखेडा रस्त्यावरील बाम्हणे गावाजवळ भिषण अपघात (Accident) झाला. या घटनेत दोन जणांचा मृत्यू तर सहा जण जखणी झाल्याची माहिती समोर येत आहे. श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी उज्जैन येथून दर्शन घेऊन येणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Bhamne Accident

दोंडाईचा-शिंदेखेडा रस्त्यावरील सात किलोमिटर अंतरावरील बाह्मणे गावाजवळ आज सकाळी पहाटे पाच वाजता मध्यप्रदेश कडून उजैन येथून भावीकांची व्हॅन सुरतकडे जात होती. यावेळी शिंदखेड्या कडून येणाऱ्या भाजीपाला घेवून जाणारी पिकअप गाडीची उजैन कडून येणाऱ्या या गाडीची समोरा समोर जोरदार धडक झाली. या घटनेत भाजीपाला गाडीचा चालक तर भाविकांच्या गाडीतील एकाचा मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी आहे.

Bhamne Accident

नागरिकांचे मदतकार्य

बाम्हणे गावातील नागरिकांना घटनेची माहिती मिळताच मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने बाहेर काढण्याचे काम नागरिकांनी सुरू केले. तर पोलीस प्रशासनाला घटनेची माहिती नागरिकांनी दिली. पोलिस अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते.

धुळे, नंदुरबारला जखमींवर उपचार

अपघातात भाविकांच्या गाडीलातील सर्व जखमी झाले असून तीन जणांना तातडीने धुळे येथील जिल्हा रुग्णालयात तर तीन जणांना नंदुरबार येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर मृत झालेल्या व्यक्तिचे उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन साठी पाठविण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT