Police patil vacancis 
उत्तर महाराष्ट्र

धुळे जिल्ह्यात शंभर गावांचा गाडा पोलिसपाटलांविना!

Dhule News : शंभरावर गावांची पोलिसपाटील ही पदे रिक्त असल्याने शेजारील गावातील पोलिसपाटलांना त्या गावाचे पद सांभाळावे लागत आहे.

सकाळ डिजिटल टीम



कापडणे : धुळे जिल्ह्यात सुमारे शंभरावर पोलिसपाटलांची (Police patil) पदे रिक्त (Vacancies) आहेत. ही पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी पोलिसपाटील संघटनेने (police patil organization) जिल्हाधिकाऱ्यांकडे (Collector) केली. संघटनेने मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी जलज शर्मा व धुळे उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे यांना दिले.

(dhule district hundred police patil vacancies fill demand in collector)

निवेदनात म्‍हटले आहे की, शंभरावर गावांची पोलिसपाटील ही पदे रिक्त असल्याने शेजारील गावातील पोलिसपाटलांना त्या गावाचे पद सांभाळावे लागत आहे. त्यांना त्या गावातील पाहिजे तेवढी माहिती नसल्याने पोलिस व महसूल प्रशासनाला माहिती देणे अडचणीचे ठरत आहे. ज्या पोलिसपाटलांचे निलंबन झाले आहे. त्यांची योग्य ती माहिती घेऊन पद सुरळीत करणे गरजेचे आहे. निलंबन सुरळीत होण्यासारखे नसेल, तर नवीन पदे भरावीत.

भरतीप्रक्रिया केव्हा?
ज्या पोलिसपाटलांनी राजीनामा दिला आहे, तेथे नवीन पदे भरावीत आदी मागण्या संघटनेने केल्या आहेत. जिल्हाधिकारी शर्मा व प्रांताधिकारी धोडमिसे यांनी पोलिसपाटील रिक्त पदांची लवकरच भरतीप्रक्रिया सुरू करू, असे आश्वासन दिले, अशी माहिती संघटनेने दिली. दरम्यान, संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष किरण देवरे, साक्री तालुकाध्यक्ष रवींद्र बेडसे, उपाध्यक्ष आंनदा पाटील, धुळे तालुका प्रभारी अध्यक्ष संदेश पाटील, धुळे तालुका महिलाध्यक्षा भारती अहिरे, सदस्य आकाश भदाणे, संदीप पाटील, अतुल भामरे आदी उपस्थित होते.


कापडणेला ‘नो पोलिसपाटील’
कापडणे हे धुळे जिल्ह्यातील मोठ्या गावांपैकी एक गाव आहे. वीस हजारांवर लोकवस्तीचा गाडा दहा वर्षांपासून पोलिसपाटीलविना सुरूच आहे. महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नवल हा कारभार विनामोबदला सांभाळत आहेत. मध्यंतरी पोलिसपाटील भरती झाली. त्या वेळीही येथे हे पद भरले गेले नाही. आता तरी हे पद भरावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT