Corona 
उत्तर महाराष्ट्र

धुळेः दोन कोरोनाबळींमुळे धोक्याची घंटा पुन्हा वाजली

कोरोनापासून व त्यातही कोरोना झाला तरी अधिक गंभीर स्थितीपासून वाचण्यासाठी कोरोनाची लस घेणे अत्यंत गरजेचे आहे.

सकाळ वृत्तसेवा



धुळे : शहरात सलग दोन दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या (Corona Patient) संख्येत झालेली किंचित वाढ व त्यातच शनिवारी दोन बाधितांचा मृत्यू (Death) झाल्याने बिनधास्त झालेल्या जिल्हावासियांची झोप उडाली आहे. राज्य शासनासह प्रशासकीय यंत्रणा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची (Third Wave Corona) शक्यता नाकारत नसल्याने हा धोका नागरिकांनीही ओळखण्याची गरज आहे. दरम्यान, लसीकरणाचे (Vaccination) कवच जास्तीत जास्त नागरिकांना मिळावे यासाठीही प्रयत्न सुरू असून याच प्रयत्नाअंतर्गत आजपासून (ता.२५) पासून ‘मिशन युवा स्वास्थ्य’ सुरू होत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचे संकट कमी झाल्याने बऱ्यापैकी दिलासा मिळाला. मात्र, तब्बल साडेचार महिन्यानंतर शनिवारी (ता.२३) दोन जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आल्याने बिनधास्त जिल्हावासियांना धक्का बसला. दोन्ही मृतांचे वय व त्यांच्यापैकी एकाला मेंदूज्वर तर दुसऱ्याला न्यूमोनिया झाल्याचे सांगण्यात आले. असे असले तरी धोक्याची घंटा कायम असल्याचेच हे संकेत मानले जातात. काही लहान मुलांनाही बाधा झाल्याचे समोर आल्याने ही बाब अधिक चिंतेची आहे. जिल्ह्यात आजअखेर तब्बल ४५ हजार ८९१ जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यातील तब्बल ६७० जणांना आपला जीवही गमवावा लागला आहे हे विसरून चालणार नाही.



लस घेतली तरीही...
कोरोनापासून व त्यातही कोरोना झाला तरी अधिक गंभीर स्थितीपासून वाचण्यासाठी कोरोनाची लस घेणे अत्यंत गरजेचे आहे. शासन, प्रशासन त्यासाठी प्रचंड आग्रही आहे. किंबहुना लसीकणामुळेच कोरोना संसर्गाचे संकट कमी झाल्याचे म्हटले जाते. त्यामुळे लसीकरण अत्यंत आवश्‍यक आहे. मात्र, लस घेतल्यानंतर बिनधास्त फिरा, गर्दी करा अशी मानसिकताही चुकीची आहे. कारण कोरोनामुळे मृत्यू झालेल्या दोघांपैकी एका व्यक्तीने कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. त्यामुळे एक डोस घेतला तरी किंवा दोन्ही डोस घेतले तरी घराबाहेर पडताना आवश्‍यक काळजी घेण्याची गरज आहे. सद्यःस्थितीत अशी काळजी हद्दपार झाल्याचे चित्र पाहायला मिळते. त्यामुळेच स्थिती बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.


मिशन युवा स्वास्थ्य
१८ वर्षावरील व्यक्तींचे जास्तीत जास्त लसीकरण व्हावे यासाठीही प्रयत्न आहेत. त्यासाठी राज्य शासनातर्फे आजपासून (ता.२५) पासून ‘मिशन युवा स्वास्थ्य' सुरू होत आहे. २ नोव्हेंबरपर्यंत हे मिशन चालेल. जास्तीत जास्त महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींचे यातून लसीकरण अपेक्षित आहे. यासाठी आरोग्य विभागाने जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची यादी तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. विद्यार्थ्यांनी नजीकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावी असे अपेक्षित आहे. मात्र, एखाद्या महाविद्यालयात जास्त विद्यार्थी लसीकरणासाठी उपलब्ध होत असतील तर तेथे लसीकरणाची व्यवस्था करता येईल असे जिल्हा कोरोना नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्यातील लसीकरण असे...
- पहिला डोस...५७.६५ टक्के
- दुसरा डोस...४६ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT