Farmer 
उत्तर महाराष्ट्र

धुळे जिल्ह्यात पावसाने मारली दडी..शेतीचे प्रचंड नुकसान

शेतकऱ्यांच्या शेतात कपाशीच्या एकूण बोंडापैकी ८० टक्के बोंडे गळून पडली आहेत. त्यामुळे उत्पादन खर्चदेखील शेतकऱ्यांच्या हाती येणार नाही.

सकाळ वृत्तसेवा

धुळे : जिल्ह्यात पावसाने (Rain) दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांचे (Farmers) नुकसान झाले. त्यात आता कपाशीच्या झुडपांवरील बोंडे गळून पडत असल्याने शेतकऱ्यांचे अधिक नुकसान होणार आहे. मोठ्या प्रमाणात खर्च करूनही अपेक्षित उत्पन्न हाती येणार नाही.

काही शेतकऱ्यांच्या शेतात कपाशीच्या एकूण बोंडापैकी ८० टक्के बोंडे गळून पडली आहेत. त्यामुळे उत्पादन खर्चदेखील शेतकऱ्यांच्या हाती येणार नाही. कोणतीही स्थिती निर्माण झाली तरी पिकाने तग धरला पाहिजे, असे बियाणे शेतकऱ्यांच्या देणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा ते व्यक्त करू लागले आहेत. जिल्ह्यात खरिपाचे यंदा चार लाख २५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. यातील जवळपास निम्म्या क्षेत्रात कपाशीची लागवड होते. दोन वर्षांत पाऊस चांगला झाल्याने कपाशीचे उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षी काही शेतकऱ्यांचे बेमोसमी पावसामुळे नुकसान झाले. असे असले तरी अनेक शेतकऱ्यांनी यंदाही कपाशीची लागवड केली. महागडे बियाणे मिळविले.


दिवस-रात्र करीत कपाशीला विहिरीचे पाणी दिले. कीटकनाशक, तणनाशकाची फवारणी केली. परंतु आता विपरित परिस्थिती निर्माण झाली आहे. कपाशीच्या झुडपांवरील बोंडे गळून पडत आहेत. त्यामुळे शेतकरी गोंधळले आहेत. जवळपास ८० टक्के बोंडे गळून पडल्याने शेतकऱ्यांना नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे. उत्पादन खर्चही शेतकऱ्यांच्या हाती लागणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत सरकार कापूस उत्पादकांना किती आणि कशी मदत करणार? हे स्पष्ट होणे आवश्यक आहे. नुकसान जास्त आणि भरपाई कमी, असा अनुभव सध्या शेतकरी घेत आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत पिकाची हानी होणार नाही, असे सुधारित वाण शेतकऱ्यांच्या हाती दिले गेले पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान कमी होईल. शिवाय हमखास उत्पन्न येईल, असे सावळदे येथील शेतकरी राजू पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

MPSC Paper Leak : पेपरफुटीला लव्ह स्टोरी नाही, सत्ताधारी जबाबदार; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

U19 IND vs U19 AUS: सेहवाग - द्रविडची मुलं आता भारतीय संघात! ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यांसाठी युवा संघाची घोषणा

Marathi News Live Updates : बेरोजगारांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात भव्य रॅली

Parel-Chinchpokli: ईद-मिलादच्या मिरवणुकीदरम्यान राडा! धक्काबुक्की, दगडफेक अन् धार्मिक घोषणाबाजी; परळ-चिंचपोकळीत तणाव, Video Viral

SCROLL FOR NEXT