diwali lakshmi pujan 
उत्तर महाराष्ट्र

सासूकडून सुनेचे, तर पतीकडून पत्नीचे पूजन 

प्रदीप पाटील

नवलनगर (धुळे) : जिजाऊ ब्रिगेडतर्फे लक्ष्मीपूजनानिमित्त सासूने सुनेचे, पतीने पत्नीचे तसेच मातापित्यांनी आपल्या कन्येचे औक्षण केले. 
जिजाऊ, सावित्रीबाई फुले, महाराणी ताराराणी, रमाई आदी महापराक्रमी महिलांचे पूजन करण्यात आले. पत्नी, आई, बहीण, मुलगीही सौभाग्याची लक्ष्मी आहेत. मातीच्या मूर्तीचे पूजनाऐवजी मानवतावादी व वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून घरात सुना व लेकींच्या पूजनाचे आव्हान केले होते. 

लक्ष्मी रूपाने महिलांचे पूजन
कौटुंबिक कलहाचे प्रमाण राज्यभरात वाढले आहे. अशा पार्श्वभूमीवर कुटुंबामध्ये स्नेहभाव निर्माण व्हावा, म्हणून लेकी व सुनांचे पूजन करण्यात आले. शहरी भागासह ग्रामीण भागात सासूने सुनेचे, तर सुनेने सासूचे औक्षण केले. काही घरांमध्ये माता पित्यांनी आपल्या कन्येच्या पूजन केले. लक्ष्मीच्या रूपाने घरातील महिलांचे पूजन केले. गृहलक्ष्मीला आदराचे स्थान देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला. 
जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे यांच्या मार्गदर्शनानुसार धुळे जिल्हा कार्यकारिणीने अनेक कुटुंबांचे समुपदेशन केले. जिजाऊ जिल्हाध्यक्ष नूतन पाटील, राज्य उपाध्यक्ष सुलभा कुंवर, वसुमती पाटील, पूजा भामरे, प्रिया पाटील, सुधर्मा सोनवणे, विद्या सयाजी, रोहिणी पाटील, मराठा सेवा संघ विभागीय अध्यक्ष दीपक भदाणे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर भदाणे, आजी- माजी जिल्हा पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. 
 
महिलांना मानाचे स्थान प्राप्त व्हावे, घराघरात महिलांना आदर मिळावा, हा व्यापक विचार करून जिजाऊ ब्रिगेडने ही संकल्पना राज्यभर पोचवण्याचा प्रयत्न केला. राज्यातील चार ते पाच हजार कुटुंबात महिलांचे पूजन झाले. यंदा हा प्रतिसाद चांगला मिळाल्याने पुढील वर्षी व्यापक स्वरूपात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. 
-माधुरी भदाणे, प्रदेशाध्यक्ष, जिजाऊ ब्रिगेड 
 
धुळे जिल्ह्यात आधुनिक पुरोगामी लक्ष्मीपूजन मोठ्या प्रमाणात व्हावे, यासाठी जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी समुपदेशन केले. उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद मिळाला. ज्या कुटुंबांनी सक्रिय सहभाग घेतला त्यांचे आभार मानते. 
-नूतन पाटील, जिल्हाध्यक्ष, जिजाऊ ब्रिगेड, धुळे 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: नागपूरला विकासाची नवी गती मिळणार, तिसरा रिंगरोड मल्टीमॉडल कॉरिडॉर बनणार; मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

Police Commemoration Day : पोलिस स्मृतीदिनानिमित्त पुण्यात हुतात्म्यांना आदरांजली, उपमुख्यमंत्र्यांनी अर्पण केले पुष्पचक्र

अहान पांडे-शर्वरी वाघच्या चित्रपटाचं शूटिंग यूकेमध्ये, अ‍ॅक्शन आणि रोमांसचा परिपूर्ण संगम

Fake Medicine : औषध भेसळ प्रकरण; दोषी कंपन्यांवर कारवाईची मागणी, विक्रेत्यांना त्रास नको

Mira Road Clash : मीरारोडमध्ये दोन गटात तुफान हाणामारी; २० रिक्षांची केली तोडफोड, मुलीच्या छेडछाडीवरून झाला वाद

SCROLL FOR NEXT