dombari samaj 
उत्तर महाराष्ट्र

त्यांची मुलंबाळं फिरताहेत गल्लोगल्ली "भाकरी' मागत...

भरत बागूल

पिंपळनेर : "दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले- हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे'...नारायण सुर्वे यांच्या कवितेतले हे जगणे आज कोरोनाच्या संकटाने अनेक समाजघटकांच्या पदरी आले आहे. डोंबारी समाज हा त्यातलाच एक घटक. रोजगार नसल्याने डोईवरचा यंदाचा हा उन्हाळा त्यांच्यासाठी अधिकच भीषण आहे. विरखेल (ता. साक्री) येथील डोंबारी समाजाच्या 70 हून अधिक कुटुंबापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्‍न उभा आहे. "भाकरीचा चंद्र' शोधण्यासाठी त्यांची मुलंबाळं गल्लोगल्ली फिरत आहेत. रेशनकार्ड नसल्याने रेशनही मिळत नाही. त्यामुळे किमान आम्हाला शिधापत्रिका उपलब्ध करा अशी त्यांची मागणी आहे.
विरखेल गावात डोंबारी समाजाची वस्ती असून, सुमारे 70 हून अधिक कुटुंबे तेथे वास्तव्यास आहेत. प्रामुख्याने गावोगावच्या यात्रोत्सवांत पाळणे लावणे, खेळणी, फुगे विकणे, डोंबाऱ्याचा खेळ करणे आदींतून हे समाजबांधव गुजराण करतात. पावसाळा वगळता आठ महिने मिळालेल्या पुंजीवर गावी परततात. पावसाळ्यात गावाकडे आल्यावर ही कुटुंबे शेतमजुरीही करतात. मात्र, आता लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यांपासून गावोगावचे यात्रोत्सव रद्द झाल्याने त्यांच्या व्यवसायावरच पाणी फेरले आहे. तीन महिन्यांपासून कुठलाही कामधंदा नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

शिधापत्रिकाही नाहीत
शासनाने वंचित घटकांना रेशन दुकानांतून मोफत धान्य वितरण सुरू केले. मात्र, विरखेल येथील 70 पैकी निम्म्याहून अधिक डोंबारी समाजबांधवांकडे शिधापत्रिकाच नसल्याने त्यांना धान्यवाटप योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही. विशेष म्हणजे या कुटुंबांकडे आधार कार्ड आहे; पण रेशन कार्ड नसल्याने त्यांना लाभ मिळालेला नाही. त्यामुळे या कुटुंबांतील लहान मुले गावात फिरून भाकरी मागून आणतात. यावरच अनेक कुटुंबांची उपजीविका सुरू आहे. प्रशासनाकडून लॉक डाउन काळात कुठलीही मदत मिळालेली नसल्याचेही या कुटुंबातील सदस्यांनी सांगितले. आमचे व्यवसाय जोपर्यंत बंद आहेत तोपर्यंत प्रशासनाने डोंबारी समाजातील कुटुंबांना रेशन उपलब्ध करून द्यावे, रेशन कार्डपासून वंचितांना त्वरित ते उपलब्ध करून द्यावे, अशी या समाजबांधवांची मागणी आहे.

यात्रेत फुगे विकण्याचा आमचा व्यवसाय आहे. मात्र, कोरोनामुळे सर्व यात्रोत्सव रद्द झाल्याने आम्ही घरीच बसून आहोत. रेशन कार्ड नसल्याने आम्हाला रेशनही मिळत नाही. घरकुलही मंजूर होत नाही. आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे रेशन कार्ड तयार करून मिळावे.
-दीपक वाघ, विरखेल, ता. साक्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अफगाणिस्तान कसोटीपूर्वी टीम इंडियाला धक्का! स्टार खेळाडूकडून निवृत्तीचा धक्कादायक निर्णय; WTC फायनलचाही होता हिस्सा

Ghansangavi Crime : भुतेगाव येथे दूधना नदीपात्रात पोलिसांची कारवाई; आठ टिप्पर तीन जीसीबी जप्त, अकरा जणाविरुद्ध गुन्हा दाखल

Pune News : महिला पोलिस सोनाली हिंगे हिचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Pune Crime : वारजे, मुंढवा परिसरात हातभट्टी अड्ड्यांवर छापे; विषारी रसायनांचा साठा जप्त

Latest Marathi News Live Update: सगळ्यांना जोडणारं तत्त्व केवळ भारताकडे- मोहन भागवत

SCROLL FOR NEXT