movement
movement 
उत्तर महाराष्ट्र

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे नवे पर्व १५ ऑगस्टनंतर

सकाळ डिजिटल टीम

१५ ऑगस्टनंतर या आंदोलनाची तीव्रता अधिक वाढवली जाणार आहे. तमिळनाडू, तेलंगण, आंध्र प्रदेश येथूनही शेतकरी नेते या आंदोलनात सहभागी होत आहेत.


धुळेः केंद्र सरकारच्या (Central Government) तीन कृषी कायद्यांविरोधात (Three agricultural laws) दिल्लीतील सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा (Farmers movement) वणवा आठ महिन्यांनंतरही कायम आहे. या कायद्यांमध्ये किरकोळ बदल केले. मात्र, ते शेतकरी हिताचे नाहीत. नुकतेच शेतकरी सभेचे ११ कार्यकर्ते (Farmers Association workers) आंदोनलस्थळी जाऊन आले. कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर आंदोलन ठाम आहे. तेथील स्थितीवरून १५ ऑगस्टनंतर या शेतकरी आंदोलनाचे नवे पर्व येणार असल्याची माहिती किशोर ढमाले यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

सुभाष काकुस्ते, वंजी गायकवाड, गोरख कुंवर, सुरेश मोरे, शिवाजी मोरे आदी या वेळी उपस्थित होते. श्री. ढमाले व श्री. काकुस्ते यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी आठ महिन्यांपासून शेतकऱ्यांचे ऐतिहासिक आंदोलन सुरू आहे. मोदी सरकार कोरोनाकाळात केलेले तीन शेतकरीविरोधी कायदे मागे घेत नाही आणि सर्व शेतीमालाला किमान आधारभूत किमतीचा हमीभावाचा कायदा करत नाही, तोपर्यंत घरवापसी नाही, असा निर्धार करून हजारो शेतकरी या बॉर्डरवर बसून आहेत. आता तर आंदोलनस्थळी अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी आहे. शौचालय पाण्यात गेले आहे. याही परिस्थितीत शेतकरी मागण्यांवर ठाम आहेत.

आंदोलनाचा वणवा आठ महिन्यांनंतरही कायम असल्याचे धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर, बुलढाणा, पुणे या ठिकाणाहून गेलेल्या सत्यशोधक शेतकरी सभा व श्रमिक शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना दिसले. १५ ऑगस्टनंतर या आंदोलनाची तीव्रता अधिक वाढवली जाणार आहे. तमिळनाडू, तेलंगण, आंध्र प्रदेश येथूनही शेतकरी नेते या आंदोलनात सहभागी होत आहेत. महाराष्ट्र सरकारने पावसाळी अधिवेशनात केंद्राच्या कायद्यात किरकोळ बदल करून आणला आहे. तो कायदाही महाराष्ट्र सरकारने मागे घ्यावा. तसेच पंजाब, राजस्थान, झारखंड या राज्यांनी ज्या पद्धतीने शेतकरीविरोधी कायदे मागे घ्यावेत व शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याचा ठराव पास करून घेतला आहे, त्याप्रमाणेच ठराव मंजूर करावा, अशी मागणी असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. दरम्यान, धुळे जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. विहिरीची पातळी खालावली आहे. त्यामुळे यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. बियाणे वाया गेले आहेत. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना सरसकट बियाण्यांची भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

१५ ऑगस्टनंतर जेलभरो आंदोलन
९ ऑगस्टला आदिवासी दिन आणि भारत छोडो दिनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना किसान आंदोलन पाठिंबा देण्याचे आवाहन करणार आहेत. यासाठी एक लाख पत्रके विविध जिल्ह्यांमध्ये वाटणार आहोत. पाच लाख लोकांशी संपर्क साधण्याचे नियोजन केले आहे. तसेच १४ ऑगस्टला प्रत्येक ग्रामपंचायतीतून निदर्शने केली जातील. अन्यथा, १५ ऑगस्टनंतर जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा श्री. ढमाले, श्री. काकुस्ते यांनी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Traffic advisory : मुंबईत PM नरेंद्र मोदींची जाहीर सभा; गर्दी टाळण्यासाठी वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Cotton Seeds : पहिल्याच दिवशी कपाशी बियाण्यांचा अत्यल्प पुरवठा; आजपासून कापूस बियाणे विक्रीचा होता मुहूर्त

MS Dhoni: धोनी RCB ला देणार सरप्राईज? CSK ने शेअर केलेल्या त्या व्हिडिओने चर्चांना सुरुवात

Share Market Today: अमेरिकन बाजार विक्रमी उच्चांकावरून कोसळले; भारतीय शेअर बाजारात कशी असेल स्थिती?

Devendra Fadnavis: "सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप चुकीचे नव्हते, तेव्हा..."; देवेंद्र फडणवीसांनी मनातलं बोलून दाखवलं

SCROLL FOR NEXT