dhule 
उत्तर महाराष्ट्र

काय सांगता...धुळ्यात लाचखोर मुख्याध्यापिका ताब्यात 

विजय शिंदे

धुळे : वेतन देण्याची शिफारस करताना शाळा दुरूस्तीच्या नावाखाली 42 हजाराची लाचेची रक्कम तक्रारदाराकडून स्विकारताना लालची मुख्याध्यापिकेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. 
 
शहरात हाजी लुकमान उर्दू प्राथमिक शाळा आहे. तेथील शिक्षकाचे मे महिन्याचे वेतन बॅंक खात्यात जमा होण्यासंदर्भात मुख्याध्यापिका निकहत नसरी अ. लतीफ (वय 40, रा. कामगारनगर, हजार खोली, धुळे) यांच्याकडे प्रस्ताव सादर होता. तिने शिक्षकाचे वेतन बॅंक खात्यात जमा करताना तीन महिन्यातील शाळा दुरूस्तीच्या नावाखाली 42 हजाराची लाच मागितली. यासंदर्भात संतप्त तक्रारदार शिक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गाठले व तक्रार नोंदविली. 
या पार्श्‍वभूमीवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या येथील पथकाने सापळा रचला. कारवाईत तक्रारदाराकडून 42 हजार 100 रूपयांची लाच स्विकारताना मुख्याध्यापिकेला पकडले. या विभागाचे नाशिक विभागीय पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलिस उपअधीक्षक सुनील कुऱ्हाडे, पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे, मंजितसिंग चव्हाण, संतोष हिरे, संदीप सरग, कृष्णकांत वाडीले, सुधीर सोनवणे, जयंत साळवे, प्रकाश सोनार, शरद काटके, प्रशांत चौधरी, भूषण खलाणेकर, संदीप कदम, भूषण शेटे, सुधीर मोरे यांनी ही कारवाई केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Airstrike Afghanistan : अफगाणिस्तानच्या कुनारमध्ये पाकिस्तानचा पहाटे एअर स्ट्राईक, अनेक नागरिक जखमी झाल्याची भीती

Ambad Fire: अंबडमध्ये पहाटे चार दुकानांना भीषण आग; साहित्य जळून खाक, ५० ते ६० लाखांचे नुकसान

Pune Solapur Railways: प्रवाशांसाठी मोठी बातमी! पुणे-सोलापूर रेल्वे प्रवास गतिमान; मांजरीपासून दोन नवीन मार्गिकांचे नियोजन, भूसंपादनाला सुरुवात

Marathi News Live Updates : 'गोकुळ'साठी आज भाजपचे शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी उद्या शेवटचा दिवस

Asian Games: भारतीय खेळाडूंचे दणादण गोल! हॉकीमध्ये पहिल्या सामन्यात पुरुष व महिला संघांची धडाकेबाज विजयी सलामी

SCROLL FOR NEXT