उत्तर महाराष्ट्र

हिरे मेडिकलमधील कोविड ओपीडी बंद

निखील सुर्यवंशी

धुळे ः सर्वाधिक कोविड रुग्ण हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल होत असल्याने व्यवस्थापनावर मोठा ताण निर्माण झाला. तो असह्य झाल्याने अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी गुरुवारी (ता. ६) कठोर निर्णय घेत रुग्णालयातील कोविड ओपीडी सेवा बंद केली. त्यानुसार महाविद्यालयाच्या रुग्णालयात आता केवळ कोविडच्या गंभीर, अत्यवस्थ रुग्णांवर उपचार होतील. 

हिरे महाविद्यालयाकडे २७३ खाटा आणि आयसीयू कक्षात ३४ व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. तेथे सद्यःस्थितीत २५३ रुग्ण दाखल असून, १२० कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. शहरासह जिल्ह्यातील ठिकठिकाणाहून कोविड आणि नॉनकोविड रुग्ण उपचारासाठी हिरे महाविद्यालयाकडेच धाव घेतात. पाच महिन्यांपासून हीच स्थिती आहे. कमी मनुष्यबळात या रुग्णालयात अहोरात्र सेवा दिली जात आहे. जुलैपासून रुग्णसंख्या वाढती असल्याने सर्वोपचार रुग्णालयातील सर्व खाटा फुल झाल्या आहेत. मोठ्या संख्येने रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडरची गरज भासू लागल्याने, आहे त्या मनुष्यबळात संबंधितांना सेवासुविधा पुरविताना महाविद्यालय व रुग्णालय व्यवस्थापनाला मोठी कसरत करावी लागत आहे. कोरोनामुळे मृत्युदर वाढत असल्याने हिरे महाविद्यालय व रुग्णालय व्यवस्थापनाला टीकेचे धनी व्हावे लागत आहे. 
 

‘त्या’ रुग्णांना आवाहन 
या पार्श्वभूमीवर चालते-फिरते, बाधित परंतु, कोविडची लक्षणे नसलेल्या रुग्णांना आता हिरे महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात दाखल करून घेतले जाणार नाही. अशा रुग्णांनी महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील, तसेच जिल्ह्यात ठिकठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घ्यावेत. महापालिकेने कार्यक्षेत्रातील खासगी रुग्णालयांमध्ये कोविडच्या रुग्णांवर उपचार होतील, अशा रुग्णालयांमधील किमान २५ टक्के खाटा कोविडसंबंधी रुग्णांसाठी आरक्षित ठेवण्याचा आदेश लागू केला आहे. या सोयीसुविधांचा लाभ संबंधित रुग्णांनी घ्यावा, असे हिरे महाविद्यालयाचे आवाहन आहे. 
 

नमुने तपासणीबाबत आवाहन 
चक्करबर्डीतील हिरे महाविद्यालयाच्या रुग्णालयात कोविडच्या गंभीर, अत्यवस्थ रुग्णांसह न्यूमोनियाच्या रुग्णांवरच उपचार होतील. या रुग्णालयात सर्वसाधारण रुग्णांसाठीची ओपीडी सेवा सुरूच राहील. आधीच्या निर्णयाप्रमाणे साक्री रोडवरील जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या रुग्णालयात नॉनकोविड रुग्णांवर उपचार सुरू राहतील. हिरे महाविद्यालयात गंभीर, अत्यवस्थ रुग्णांचेच नमुने (स्वॅब) तपासणीसाठी घेतले जातील. इतर रुग्णांनी नमुने तपासणीसाठी साक्री रोडवरील जिल्हा शासकीय रुग्णालय, तसेच महापालिका क्षेत्रातील संबंधित कोविड सेंटर, जिल्ह्यात ठिकठिकाणी असलेल्या उपजिल्हा रुग्णालय, नमुने तपासणीची सुविधा असलेल्या कोविड केअर सेंटरशी संपर्क साधावा, असे आवाहन आहे. 

मृत्युदर कमी करण्यावर भर 
कोविडच्या रुग्णांचा मृत्युदर कमी करणे, शरीरातील ऑक्सिजनची पातळी ९० पेक्षा कमी असलेल्या रुग्णांवर हिरे महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार होतील. त्यासोबत ‘सारी’चे २० रुग्ण दाखल झाल्याने व्यवस्थापनाच्या चिंतेत भर पडली आहे. त्यामुळेच व्यवस्थापनाने विविध निर्णय घेतले. त्यास जिल्हा शासकीय रुग्णालय, महापालिका, सर्व कोविड केअर सेंटरने सहकार्य करावे, असे आवाहन आहे. 

संपादन भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: पुन्हा सूरत पॅटर्न! शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत केला भाजप प्रवेश..काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदी सोलापुरात दाखल; थोड्याच वेळात होणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Health Care : अवकाळी पावसानंतर सावधगिरी बाळगा; सर्दीसह दमा, श्वसन विकारात होते वाढ

SCROLL FOR NEXT