poultry farming 
उत्तर महाराष्ट्र

लॉकडाऊनमध्‍ये नुकसान; कोरोनामुळेच ते निघतेय भरून 

जगन्नाथ पाटील

कापडणे : मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून लॉकडाऊन जाहीर झाला. त्यामुळे तीन महिने कडकडीत बंद राहिल्याने लेअर पक्षीपालन पूर्णतः संकटात सापडले. योगेश माळी यांचे या तीन महिन्यांत पन्नास लाखांचे नुकसान झाले. दररोज सरासरी आठ हजार अंड्यांचे उत्पादन खपविणे बंद झाले. ८० टक्के उत्पादकांनी पक्षी फुकटात विकले, खड्ड्यांत पुरले. मात्र, माळी यांनी नुकसानीची झळ सोसत साडेआठ हजार पक्ष्यांचे पालनच केले अन्‌ गेल्या महिन्यापासून अंड्यांचे दर वाढल्याने हा व्यवसाय तेजीत आला आहे. 

लॉकडाऊनची भरपाई निघेल 
योगेश माळी यांनी लॉकडाऊनच्या काळात दररोज पंधरा ते वीस हजार रुपयांचे नुकसान सहन केले. साडेआठ हजार पक्षी जगविले. आता अंड्याचे घाऊक दरही प्रतिअंडी पाच रुपयांपर्यंत पोहोचले. कोरोनाबाधित आणि सुरक्षतेचा उपाय म्हणून अंडी सेवनाचे प्रमाण प्रचंड वाढल्याने अंड्यांचे दर आणखी वाढतील, असे माळी यांनी सांगितले. 

...नाहीतर नोकरीच केली असती 
योगेश माळींकडे साडेआठ हजार पक्षी आहेत. सरासरी दररोज आठ हजार अंडी उत्पादीत होतात. दररोजची सरासरी बत्तीस हजारांची उलाढाल आहे. वार्षिक दीड कोटीची उलाढाल होते. खर्च काढून बऱ्यायापैकी नफा आहे. एमएसडब्ल्यू केल्यानंतर प्रतिमाह सहा हजारांची नोकरी मिळाली; पण माळी यांचे मामा पशुवैद्यकीय डॉ. लक्ष्मण किसन तिसगे यांनी मार्गदर्शन केले अन्‌ साडेतीन वर्षांत मोठा उद्योग उभा राहिला. दहा जणांना रोजगार उपलब्ध करून दिला. त्यामुळे माळी युवा उद्योजक झाले. यासाठी बँकेची साथही मोलाची आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gas Shortage: हॉटेल व्यावसायिकांसाठी मोठा निर्णय! कमर्शियल सिलिंडरचा कोटा २० टक्के, पण 'यांनाच' मिळेल गॅस

बाबो...! 'हा' अभिनेता चक्क विकतोय सिलेंडर, १० लाख रुपयांना एक सिलेंडर आणि...

Latest Marathi News Live Update : धुळ्यात गॅस टंचाईमुळे लाकडांची विक्री वाढली

मुंबई महापालिकेतील नगरसेवकांवर गुन्हेगारी छाया! २२७ नगरसेवकांपैकी कितींवर गुन्हेगारी खटला दाखल? ADR अहवालात धक्कादायक खुलासा

Crime: 'अहो ऐका ना, भजी आणता का'? खाण्याच्या बहाण्याने पतीला बसमधून उतरवले, नंतर पत्नीने प्रियकरासोबत नको ते केले

SCROLL FOR NEXT