उत्तर महाराष्ट्र

धुळ्यात एमआयएमच्या आमदारांसह कार्यकर्ते ताब्यात

निखील सुर्यवंशी

धुळे: एमआयएमचे नेते असदउद्दीन ओवेसी (MIM leader Asaduddin Owaisi) यांच्या दिल्लीतील निवासस्थानावर समाजकंटकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या ( Home Attacks) निषेधार्थ येथे आमदार डॉ. फारुक शाह (MLA Dr. Farooq Shah) यांनी मोर्चा काढला. तो क्युमाईन क्लबजवळ आल्यानंतर शहर पोलिसांनी आमदार शाह आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत वाहनातून पोलिस (Police) ठाण्यात नेले.


शहरातील लोकमान्य हॉस्पिटलपासून क्युमाईन क्लबपर्यंत मोर्चा निघाला. मोर्चेकऱ्यांनी समाज कंटकांना अटकेची मागणी करत मोदी सरकारच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. ओवेसी यांच्या वाढत्या लोकप्रियतेचा धसका घेऊन घाणेरडे राजकारण केले जात असल्याचा आरोप आमदार शाह यांनी केला. त्यांनी पोलिस उपअधीक्षक दिनकर पिंगळे यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे, की काही समाजकंटकांनी मंगळवारी एमआयएमचे प्रमुख नेते खासदार असदउद्दीन ओवेसी यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची तोडफोड केली. त्यावेळी नेते ओवेसी त्यांच्या निवासस्थानी उपस्थित नव्हते. घरावरील हल्ल्यानंतर ओवेसी यांनी भाजप या धर्मांधतेला जबाबदार आहे, असे म्हटले. खासदाराच्या घरावर अशाप्रकारे हल्ला झाल्यास त्यातून काय संदेश जातो, असा प्रश्‍न नागरिकांसमोर आहे.


आपले मत व्यक्त करणे हा अधिकार देशातील प्रत्येक नागरिकाला संविधानाने दिला आहे. तो हल्ल्यांनी कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. संघ व भाजपच्या विभाजनवादी प्रवृत्तीमुळे उत्तर प्रदेशची सत्ता हातातून जाण्याची भीती असल्याने योगी आणि परिवाराच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे. त्यामुळेच खासदार ओवेसी यांच्या घरावर हल्ला करून लक्ष विचलित करण्याचा केविलवाणा प्रयत्न चालविल्याचे निवेदनात नमूद आहे. मोर्चात आमदार शाह, नगसेवक युसूफ मुल्ला, सईद बेग, नासीर पठाण, गनी डॉलर, शहराध्यक्ष नुरा ठेकेदार, महिला जिल्हाध्यक्ष डॉ. दीपश्री नाईक, महिला शहराध्यक्ष फातेमा अन्सारी, युवा जिल्हाध्यक्ष वसीम अक्रम, युवा अध्यक्ष सेहबाज फारुक शाह, साबीर पत्रकार, अमीर पठाण, साजिद साई यांच्यासह कार्यकर्ते सहभागी होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT