mla farukh shah 
उत्तर महाराष्ट्र

"राज्य उत्पादन'च्या दारात आमदारांचा ठिय्या 

सकाळ वृत्तसेवा

धुळे : शाळेच्या समोर असलेली दारूची दुकाने बंद करा, या मागणीसाठी अगदी मंत्र्यांपर्यंत तक्रार करूनही स्थानिक अधिकारी कार्यवाही करत नसल्याने आज शहराचे आमदार डॉ. फारुक शाह यांनी येथील राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांचे कार्यालय गाठले. अधीक्षक नसल्याने डॉ. शाह यांनी कार्यालयाबाहेरच ठिय्या मांडला होता. 

शहरातील चाळीसगाव रोडवरील दोन इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या समोर सत्यम वाइन शॉप व पूनम वाइन शॉप ही दारूची दुकाने सुरू आहेत. शाळेच्या परिसरातील ही दारूची दुकाने बंद करावीत अथवा स्थलांतरित करावीत, अशी डॉ. शाह यांची मागणी आहे. या मागणीसाठी त्यांनी स्थानिक प्रशासनासह थेट तत्कालीन मंत्र्यांकडेही तक्रार केली आहे. मंत्र्यांनी आदेश दिलेले असताना दुकानांवर कारवाई होत नसल्याचे डॉ. शाह यांचे म्हणणे आहे. या पार्श्‍वभूमीवर डॉ. शाह आज थेट येथील राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालयात गेले. 

कार्यालयाबाहेर ठिय्या 
आमदार डॉ. शाह राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांच्या कार्यालयात गेले त्यावेळी तेथे अधीक्षक संजय पाटील नव्हते. ते जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी गेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे डॉ. शाह यांनी कार्यालयाबाहेरच खुर्ची टाकून ठाण मांडले. अधीक्षक पाटील येत नाही, तोपर्यंत येथून उठणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती. सुरवातीला डॉ. शाह अधीक्षक पाटील यांच्या दालनातील रिकाम्या खुर्चीसमोर बसून होते. दरम्यान, गेल्या पाच-सहा दिवसांपासून फोन करूनही अधिकारी प्रतिसाद देत नसल्याने आमदार डॉ. शाह यांना आज उत्पादन शुल्कच्या कार्यालयात जावे लागल्याचे सांगण्यात आले. 

...मग मतदान घ्या 
दरम्यान, अधीक्षक पाटील जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीवरून आल्यानंतर आमदार डॉ. शाह यांनी त्यांच्याकडे पुन्हा मागणी मांडली. प्रत्यक्ष दारूच्या दुकानांच्या ठिकाणीही पाहणी केली. नियमानुसार शाळेपासून 100 मीटरच्या आत दुकान असेल तर ते हटविता येते. संबंधित ठिकाणी 135 मीटर अंतर असल्याचा तर्क अधिकाऱ्यांनी दिल्याचे सांगण्यात आले. त्यावर आमदार डॉ. शाह यांनी या भागातील नागरिकांचे मतदान घ्या व नागरिकांनी कौल दिला तर दुकान हटवा, अशीही मागणी करून टाकली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ठाकरे बंधू एकटवले! ४ ऑक्टोबरला 'जनमोर्चा'ची घोषणा; नेमका मुद्दा काय?

Virat Kohli Retirement: २०२७ चा वर्ल्ड कप हा माझा भारतासाठी शेवटचा...; विराट कोहलीचे निवृत्तीचे संकेत, रोहित शर्माही म्हणाला की...

Amazon Great Indian Festival sale 2026: स्मार्टफोन्सवर ऑफरचा पाऊस; मिळणार भरघोस डिस्काउंट! पाहा कोणत्या फोनची किंमत किती?

Incognito मध्ये सर्च केल्यावर हिस्ट्री दिसत नाही; पण ‘या’ लोकांना तुमची माहिती कळू शकते

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात मनसे-ठाकरे गटाचा ४ ऑक्टोबरला संयुक्त मोर्चा

SCROLL FOR NEXT