Dhule corporation Dhule corporation
उत्तर महाराष्ट्र

धुळ्यात उपमहापौरांची सोमवारी निवड

धुळ्यात उपमहापौरांची सोमवारी निवड

सकाळ डिजिटल टीम

धुळे : येथील भाजपचे महापौर चंद्रकांत सोनार आणि या पक्षाच्या उपमहापौर कल्याणी अंपळकर यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ ३० जूनला संपुष्टात येत आहे. महापौरपदाच्या आरक्षणप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल असल्याने त्यावर १२ जुलैला कामकाज असेल. त्यामुळे महापौरपद अंतिम निकाल लागेपर्यंत रिक्त राहण्याची शक्यता असेल. मात्र, उपमहापौरपदाची निवडप्रक्रिया सोमवारी (ता. २८) पार पडणार आहे. (Monday-election-of-deputy-mayors-in-Dhule-corporation)

महापौरपदासाठी पूर्वी ओबीसी आरक्षण निघाले होते. या प्रक्रियेवर आक्षेप घेत स्थायी सभापती संजय जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. त्यात येथील महापौरपदापासून एससी संवर्ग वंचित असून, पूर्वी निघालेले ओबीसी संवर्गाचे आरक्षण रद्द करावे, अशा मागणीची याचिका सभापती जाधव यांनी दाखल केली होती. वीस वर्षांपासून येथील महापौरपद एससी संवर्गाला मिळू शकलेले नाही, असे त्यांनी याचिकेद्वारे निदर्शनास आणले. त्यावर कामकाजानंतर औरंगाबाद खंडपीठाने ७ मे २०२१ ला शिक्कामोर्तब करत धुळे महापौरपदासाठीचे ओबीसी आरक्षण रद्द केले. मात्र, या निर्णयाविरोधात भाजपचे नगरसेवक प्रदीप कर्पे, प्रतिभा चौधरी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यात त्यांनी ओबीसी आरक्षण ‘जैसे थे’ ठेवण्याची मागणी करतानाच राज्यात निघालेले आरक्षण योग्य पद्धतीचे असल्याचा युक्तिवाद केला.

३० जूनकडे सर्वांचे लक्ष

राज्यात २७ महापालिका असून, त्यासाठी नोव्हेंबर २०१९ मध्ये सोडत पद्धतीने आरक्षण काढण्यात आले. त्या वेळी चिठ्यांमध्ये सर्व जाती संवर्गाचा समावेश होता. त्यातून धुळे महापालिकेसाठी ओबीसी आरक्षण निघाले. शिवाय २७ महापालिकांपैकी अनुसूचित जातीला (एससी) तीन, अनुसूचित जमातीला (एसटी) एक, ओबीसी संवर्गाला सात, खुल्या प्रवर्गाला आठ, महिलांसाठी आठ जागांवर आरक्षण निघाले. याचा अर्थ सर्व जाती संवर्गाला आरक्षण मिळाले. त्यात धुळे महापालिकेचे ओबीसी आरक्षण रद्द केले तर अन्याय होईल, असा युक्तिवाद याचिकाकर्ते कर्पे, सौ. चौधरी यांच्यातर्फे करण्यात आला आहे. त्यावर १२ जुलैला अंतिम कामकाजाची शक्यता असेल. परिणामी, खुल्या जागेमुळे महापौर झालेले श्री. सोनार यांचा ३० जूनला कालावधी संपुष्टात आल्यानंतर काय घडते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

भाजप नेत्यांकडून नावनिश्‍चिती

या पार्श्‍वभूमीवर महापौरांच्या निवडीचा कार्यक्रम न घेता केवळ उपमहापौरदाच्या निवडीचा कार्यक्रम गुरुवारी (ता. २४) जाहीर झाला. उपमहापौरपदाची निवड सोमवारी सकाळी अकराला विशेष महासभेत होईल. जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी संजय यादव यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडप्रक्रिया होईल. या पदासाठी निशा पाटील, सुरेखा उगले, भगवान गवळी, अनिल नागमोते, रावसाहेब नांद्रे आदींची नावे चर्चेत आहेत. मात्र, भाजपचे नेते डॉ. सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल उपमहापौरपदाचा उमेदवार निश्‍चित करतील, असे सांगण्यात आले. भाजपची महापालिकेत एकहाती सत्ता असून, या पक्षाचे ५०, तर एकूण ७४ सदस्य आहेत.

उपमहापौर निवडीचा कार्यक्रम

महापालिकेत उपमहापौरपदासाठी इच्छुकांना २५ ते २७ जूनला सकाळी अकरा ते दुपारी एकपर्यंत नगरसचिव कार्यालयातून नामनिर्देशनपत्र प्राप्त करता येईल. त्यासाठी शनिवारी, रविवारी सुटीच्या दिवशीही कार्यालय सुरू राहील. २५ ते २७ जूनपर्यंत सकाळी अकरा ते दुपारी दोनपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत आहे. तसेच २८ जूनला सभेचे कामकाज सुरू झाल्यावर नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल.

महापौरपदाच्या आरक्षणप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. त्यावर १२ जुलैला कामकाज असले तरी त्यापूर्वी सुनावणी होण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे महापौरपद फार काळ रिक्त राहण्याचा प्रश्‍न निर्माण होणार नाही, अन्यथा १२ जुलैनंतर न्यायालयाकडून प्राप्त निर्देशानुसार यथोचित प्रक्रिया पार पाडली जाऊ शकते.

-अजीज शेख, आयुक्त, धुळे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

SCROLL FOR NEXT