bhamre
bhamre 
उत्तर महाराष्ट्र

गर्दीमुळे जिल्हाधिकाऱ्यांचा प्रवासी पास "दुतर्फा' ग्राह्य धरावा ः खासदार डॉ. भामरे

निखिल सूर्यवंशी

धुळे ः संसर्गजन्य "कोरोना व्हायरस'मुळे "लॉक डाउन', संचारबंदीसारख्या उपाययोजना सुरू असल्याने 24 मार्चपासून शेकडो कामगार, विद्यार्थी, विविध घटकातील व्यक्ती धुळे जिल्ह्यात, परजिल्ह्यात, परराज्यात अडकून पडल्या आहेत. प्रवासी पास मिळत नसल्याने त्यांना अनंत हालअपेष्टांना सामोरे जावे लागत आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी सरकारच्या निर्णयाप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी "ऑनलाइन' अर्ज मागविले. मात्र, इंटरनेटवरील लिंक ओपन होत नसल्याने असंख्य प्रवासी, पीडित नातेवाइकांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर शारीरिक अंतराचा फज्जा उडवत धडक मारली.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांचा प्रवासी पास जिल्ह्यातून इतरत्र जाणारे आणि इतर ठिकाणाहून जिल्ह्यात येणाऱ्यांसाठी ग्राह्य मानला जावा, अशी मागणी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी आज प्रशासनासह राज्य सरकारकडे केली. येथील काही रुग्णांना तत्काळ वैद्यकीयदृष्ट्या प्रगत जिल्ह्यात जाण्यासाठी, तसेच राज्यासह परराज्यात ठिकठिकाणी अडकलेल्या कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी, पर्यटक तसेच अन्य व्यक्तींना शहरासह जिल्ह्यात यायचे आहे, तर काहींना ठिकठिकाणी जायचे आहे. त्यासाठी शासनाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत "ऑनलाइन' अर्ज मागवून संबंधितांना प्रवासी पास देण्याचे सूचीत केले. मात्र, ती लिंक ओपन होत नसल्याने त्रस्त कामगार, नातेवाइकांसह असंख्य व्यक्तींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.

प्रवासी पाससाठी काय करावे?
"लॉक डाउन' कालावधीत जिल्ह्यातून आपल्या गावी जाण्यासाठी संबंधित नागरिकांना सशर्त प्रवासी पास देण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी संजय यादव यांनी आज दिली. संबंधितांना मूळ गावी जाण्यासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या स्तरावरून प्रवासी पास देण्यात येतील. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.dhule.gov.in या संकेतस्थळावरील लिंकद्वारे पाससाठी अर्ज करायचा आहे. संबंधित व्यक्तीस खोकला, ताप अशी कोणतीही लक्षणे नसावीत. प्रवास करणारी व्यक्ती कोणत्याही क्वांरटाइन क्षेत्रातील रहिवासी नसावी किंवा कोरोना विषाणूबाधित रुग्णाच्या संपर्कातील नसावी. पाससमवेत आधार कार्ड, मतदान कार्ड, वाहन चालक परवाना, पॅनकार्ड, बॅंकेचे पासबुक, छायाचित्रासह ओळखपत्र असणे आवश्‍यक आहे. अशा प्रकारचा परवाना कोणाला सापडल्यास तो त्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करावा. हा परवाना कोविड-19 चे हॉटस्पॉट क्षेत्र वगळता परवानाधारकाने मागणी केलेल्या जिल्ह्यात त्याच्या गावी जाण्यास वैध राहील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले.

खासदार डॉ. भामरे यांची भूमिका
खासदार डॉ. सुभाष भामरे म्हणाले, की सरकारने प्रवासी पास देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सूचीत केले. मात्र, त्याची कार्यप्रणाली, मार्गदर्शक तत्त्वे स्पष्ट केली नाही. याबाबत सायंकाळनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी "व्हीडीओ कॉन्फरन्स'द्वारे जिल्हा प्रशासन बोलणार होते. परजिल्हा, परराज्यातून धुळ्याकडे येणारे आणि धुळ्याकडून इतरत्र जाणाऱ्यांसाठी येथील जिल्हाधिकाऱ्यांचाच प्रवासी पास ग्राह्य मानला जावा, अशी मागणी आहे. त्यामुळे विलंब टळेल. अन्यथा, परराज्य, परजिल्ह्यात अडकलेल्यांची यादी धुळे जिल्हाधिकारी कार्यालय तयार करेल. मग ती यादी संबंधित ठिकाणच्या जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविली जाईल. मग पास तयार होईल. ही सर्व वेळ खाऊ प्रक्रिया ठरेल. ते लक्षात घेता माझी मागणी मान्य व्हावी, असा आग्रह असल्याचे डॉ. भामरे म्हणाले.

पाससाठी हेल्पलाइन क्रमांक
किशोर घोडके, खनिकर्म अधिकारी- 94051 97840 (नाशिक विभाग, जळगाव, नगर, नंदुरबार, नाशिक). संजय बोरसे, समन्वयक, वनहक्क- 94234 93391 (अमरावती विभाग, अमरावती, वाशीम, अकोला, बुलडाणा, यवतमाळ). आशिष वांढरे, टेक्‍निकल इंजिनिअर- 9730519238 (नागपूर विभाग, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली). भूषण पाटील- 94036- 38737 (पुणे विभाग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर), चंद्रकांत शेळके (मराठवाडा विभाग, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, हिंगोली). 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT