Dhule Municipal Corporation
Dhule Municipal Corporation 
उत्तर महाराष्ट्र

धुळे महापौर आज निवड: एकदा मत दिल्यानंतर बदल नाही

निखील सुर्यवंशी

धुळे ः महापालिकेत (Dhule Municipal Corporation) आज सकाळी अकरापासून महापौरपदाची निवडप्रक्रिया (Mayor Election)सुरू होईल. त्यासाठी ऑनलाइन मतदान (Online voting) करावे लागेल. एकदा मत दिल्यानंतर पुन्हा त्यात बदल करता येणार नाही, असे यंत्रणेने सूचित केले आहे.


महापालिकेच्या सभागृहातून अशी राबविली जाईल मतदान प्रक्रिया ः

सकाळी अकराला पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचे स्वागत केले जाईल. नंतर नगरसचिव मनोज वाघ प्राप्त उमेदवारी अर्ज पीठासीन अधिकाऱ्यांना सुपूर्द करतील. पीठासीन अधिकारी महापौरपदासाठी दाखल उमेदवारी अर्ज वाचून दाखवतील. नंतर ते महापौरपदासाठी दाखल उमेदवारी अर्जांची छाननी करून वैध उमेदवारांची नावे वाचून दाखवतील. नंतर अर्ज माघारीसाठी पंधरा मिनिटांचा वेळ दिला जाईल. माघारीतील उमेदवारांची नावे सांगितल्यावर नगरसचिव वाघ ऑनलाइन मतदानाची पद्धत समजावून सांगतील. अनुक्रमे प्रभाग क्रमांकनिहाय सदस्य नगरसेवकांचे नाव पुकारले जाईल. नंतर सदस्यांनी व्हिडिओ कॅमेरा सुरू करून माइक म्यूट करावा. आपले नाव सांगून ज्या उमेदवाराला मत द्यावयाचे आहे, त्याचे नाव सांगावे किंवा मत नोंदवायचे नसल्यास तसे तटस्थ म्हणून सांगावे. सदस्यास मत एकदा नोंदविण्यात आल्यानंतर पुन्हा मत देण्याची किंवा आपले मत बदलण्याची मुभा असणार नाही.

मतदान प्रक्रियेत प्रभाग क्रमांकनिहाय नाव पुकारल्यानंतर ऑनलाइन उपस्थित नसल्यास सदस्यांना आपले मत देण्यासाठी रास्त व वाजवी संधी मिळावी म्हणून सर्व प्रभागाची मतदान प्रक्रिया झाल्यानंतर पुनश्च आपले नाव पीठासीन अधिकाऱ्यांद्वारे पुकारण्यात येईल. नंतरही मतदान न केल्यास अथवा ऑनलाइन उपस्थित न राहिल्यास सदस्याची अनुपस्थिती गृहीत धरण्यात येईल. ज्यांनी मतदान केले नाही अशा सदस्यांची नोंद केली जाईल. पीठासीन अधिकारी प्रत्येक उमेदवारास प्राप्त झालेल्या मतांची संख्या घोषित करतील. ज्या उमेदवारास सर्वांत जास्त मते मिळतील तो उमेदवार महापौर म्हणून निवडून आल्याचे घोषित केले जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक घटना! मुलीला बोटावर शस्त्रक्रियेसाठी नेले, डॉक्टरांनी चुकून केली जिभेवर शस्त्रक्रिया

बारावीचा 21 किंवा 22 मे रोजी तर दहावीचा निकाल 30 मेपूर्वी! ‘या’ संकेतस्थळांवर पाहता येईल निकाल; जुलैमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा

Dahi Poha Recipe: सकाळच्या नाश्त्यात दही पोह्याचा घ्या आस्वाद ,जाणून घ्या रेसिपी

लोकसभा निवडणुकीत भाजप-एनडीए 400 जागा पार करणार; अंबाबाई दर्शनानंतर माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

Corona Vaccine : कोरोना प्रतिबंधक ‘कोवॅक्सिन’चेही दुष्परिणाम; बनारस हिंदू विद्यापीठातील चाचण्यांमधील निरीक्षणे

SCROLL FOR NEXT