उत्तर महाराष्ट्र

धुळे मनपा सभेत मूलभुत समस्या सोडून..थेट सट्टा, दारू अड्ड्यांवर घसरली

निखील सुर्यवंशी



धुळे : शहरातील अनियमित पाणीपुरवठा (Water supply), कोरोना संसर्ग(Corona infection) , आरोग्य सुविधांचे (Health faciliti) प्रश्नही कायम आहेत. असे असताना महापालिकेत (Municipal Corporation Dhule) झालेल्या स्थायी समितीची सभा सट्टा, मटका, जुगार, गावठी दारूअड्ड्यांच्या विषयांवर घसरली. त्यामुळे शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचा मुद्दा मांडण्यात आला. याप्रश्‍नी पोलिस प्रशासनाला जाणीव करून देण्याचा ठरावही सभेत पारित झाला. यात पायाभूत सुविधांचे (Infrastructure) प्रश्‍न काहीसे बाजूला पडले.
(dhule municipal corporation standing committee meeting basic problem)

सभापती संजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, नगरसचिव मनोज वाघ, अभियंता कैलास शिंदे, सदस्य सुनील बैसाणे, शीतल नवले, अमोल मासुळे, भारती माळी, किरण कुलेवार, पुष्पा बोरसे, बन्सीलाल जाधव, कमलेश देवरे, अमिन पटेल आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

बेकायदा नळजोडण्या
सदस्या बोरसे यांनी प्रभागातील पाणीटंचाईचा मुद्दा मांडला. कर देणाऱ्यांना नियमित पाणीपुरवठा होत नाही. महापालिकेचे काही कर्मचारी परस्पर बेकायदेशीरपणे नळ जोडण्या करतात. तेथून मुबलक पाणीपुरवठा होतो. प्रभागात अनेक ठिकाणी जलवाहिन्यांना गळती आहे. याबाबत वारंवार पत्रव्यवहार केला. पण दाद दिली जात नाही. याप्रश्‍नी सभापती जाधव यांनी गळती रोखून सर्वांना समान पाणीपुरवठ्याची सूचना यंत्रणेला दिली.

जुगारअड्ड्यांवर गर्दी
सदस्य बैसाणे यांनी शहरात अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असून, सट्टा, मटका, जुगार, दारूअड्ड्यांवर गर्दी दिसत असल्याचे सांगितले. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढतो. याबाबत पोलिस प्रशासनाला सतर्क करावे, महापालिका प्रशासनाने तसे पत्र द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

लसीकरणाबाबत सूचना
काही सदस्यांनी कोरोनाचा संसर्ग, पावसाळी स्थितीमुळे निरनिराळ्या वसाहतींमध्ये कीटकनाशकांची फवारणी करावी. पाणीपुरवठा नियमित कसा राहील, याविषयी मांडणी केली. शहरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण होताना केंद्रावर गोंधळ उडतो. महापालिका प्रशासनाने अनेक ठिकाणी केंद्र सुरू करून गर्दी कशी विरळ होईल याची काळजी घ्यावी, असे सदस्य नवले, मासुळे यांनी सुचविले. त्यांच्यासह सदस्य बैसाणे यांनी लसीकरण व रेमडेसिव्हिरकडे लक्ष वेधले. अनेक नागरिकांनी पहिला डोस घेतला. त्यांना ५० दिवस उलटूनही दुसरा डोस मिळालेला नाही. त्यामुळे लसीकरणाचा मूळ उद्देश सफल होणार नाही. नोंदणी करूनही अनेक नागरिकांना लस उपलब्ध होत नाही. मिल परिसरातील केंद्र पाच दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे लसींचा अधिक पुरवठा करावा. महापालिकेने रेमडेसिव्हिर उपलब्धतेचा चांगला निर्णय घेतला, असे या सदस्यांनी सांगितले. अतिरिक्त आयुक्त गिरी यांनी लसींचा अल्प पुरवठा होत असल्याचे सांगत लसीकरणासाठी १८ ते ४४ वयोगटांसाठी दोन केंद्र व दुसऱ्या डोससाठी स्वतंत्र केंद्र तयार करण्याचे नियोजन असल्याचे स्पष्ट केले. तसेच डोस प्राप्त झाल्यानंतर एक दिवस अगोदर जाहीर केले जाईल, त्यासाठी ऑनलाउन नोंदणी, अपॉइंटमेंट आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

(dhule municipal corporation standing committee meeting basic problem)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare : "मिस्टर राज, तुम्हाला माझ्या नावाची सुपारी..." सुषमा अंधारे यांचा लाव रे तो व्हिडीओवरून हल्लाबोल

Raj Thackeray : राज ठाकरेंचा पुन्हा एकदा 'लाव रे तो व्हिडीओ', सुषमा अंधारेंचा जुना व्हिडीओ दाखवून उद्धव ठाकरेंना सवाल

Ravindra Dhangekar : भाजपकडून पुण्यात पैसे वाटल्याचा आरोप, काँग्रेस उमेदवार धंगेकरांचं पोलिस ठाण्यात धरणे आंदोलन

Loksabha election : निवडणूक किस्सा! अमिताभ बच्चन उमेदवार अन् लिपस्टिकच्या खुणा असलेल्या चार हजार मतपत्रिका...

IPL 2024 RCB vs DC : आरसीबीची विजयी पंचमी; दिल्लीच्या पराभवाने पॉईंट टेबल झालं रंजक

SCROLL FOR NEXT