उत्तर महाराष्ट्र

धुळ्यात व्यापाऱ्यांना उपकर भरण्याविषयी नोटिसा

शासनाच्या दप्तरी व्यापार-व्यवसाय सुरू असला तरी व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून पुरेशी उलाढाल होत नाही.

निखिल सुर्यवंशी

धुळे : कोरोनाचा (corona) संसर्ग रोखण्यासाठी अनेक निर्बंध आहेत. आजही धुळे शहर आणि जिल्ह्यात वीकेंड लॉकडाउन (Lockdown) आहे. आठवड्यातील पाच दिवसांत केवळ दुपारी चारपर्यंत व्यापार-उद्योगास (Trade-industry)मुभा आहे. अशा स्थितीत लहान-मोठा व्यापारी अडचणीत (Crisis) आला आहे. या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांना कुठलीही नोटीस द्यायची नाही, असा निर्णय शासनाने घेतला आहे. तरीही धुळे महापालिका प्रशासन (Dhule Municipal Corporation) व्यापाऱ्यांना स्थानिक उपकर भरण्याविषयी नोटिसा देत (Tax notice)आहे. त्या त्वरित थांबवाव्यात, अशी मागणी व्यापारी महासंघाचे प्रवर्तक नितीन बंग यांनी केली.

(dhule municipal corporation tax notices were issued to traders)



महापालिका प्रशासनातर्फे शहरातील व्यापाऱ्यांना उपकर भरण्याविषयीच्या नोटिसा दिल्या आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर व्यापारी महासंघाने प्रशासनास निवेदन दिले. याबाबत श्री. बंग यांनी सांगितले, की दोन महिन्यांपासून कोरोना संसर्गामुळे व्यापार-उद्योगावर निर्बंध आले आहेत. शनिवार आणि रविवारी व्यवसाय पूर्णतः बंद राहतो. इतर दिवशी दुपारी चारपर्यंतच मुभा आहे. व्यापार-उद्योगासाठी असलेला कालावधी ग्राहकांसाठी सोयीचा ठरत नाही. त्यामुळे शासनाच्या दप्तरी व्यापार-व्यवसाय सुरू असला तरी व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून पुरेशी उलाढाल होत नाही. अनेक व्यावसायिकांकडून अद्याप व्यवसायाचे परिक्षण झालेले नाही. पण त्याचवेळी महापालिका प्रशासनाने उपकर भरण्याविषयीच्या नोटिसा जारी केल्या आहेत.

दीड वर्षापासून कोरोना संसर्गामुळे व्यापार-उद्योग बंद आहेत. त्याचा एकूणच उलाढालीवर आणि उद्योग व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून करआकारणी करण्याबाबत कुठलीही घाई नको, असा निर्णय शासनाने घेतला आहे. परंतु, महापालिका प्रशासन शहरातील व्यापाऱ्यांना उपकर भरण्याविषयीच्या मुदत घालून दिलेल्या नोटिसा देत आहे. मुदतीत जर उपकर भरला नाही, तर मोठ्या आकारात दंड वसूल केला जाणार आहे. त्यामुळे व्यापारी चिंताग्रस्त आहेत. महापालिकेने उपकर मागणीच्या नोटिसा देणे बंद करावे. परिस्थिती पूर्ववत झाली, की व्यापारी आणि उद्योजक उपकराचा भरणा करतील, असे स्पष्टीकरण श्री. बंग यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karmabhoomi Express Accident : हृदयद्रावक ! कर्मभूमी एक्सप्रेसमधून तीन युवक खाली पडले; दोघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी

Panchang 19 October 2025: आजच्या दिवशी सूर्य कवच स्तोत्र पठण व ‘श्री सूर्याय नमः’ या मंत्राचा जप करावा

माेठी बातमी! 'साेलापुरातील धानप्‍पाला बंगळूर पोलिसांनी उचलले'; कर्नाटक मंत्र्यांच्या मुलाला नेमकं काय म्हणाला?

Chandrakant Patil Sangli : सांगलीत भाजपकडून मित्रपक्षांना थेट दुय्यम दर्जा, 'जागा उरल्या तर मित्रपक्षांचा विचार'; चंद्रकांत दादांनी थेटच सांगितलं...

आनंदाची बातमी! सोलापूर जिल्ह्यातील महापूर, अतिवृष्टीने बाधितांसाठी ७७२ कोटी, आजपासून पैसे खात्यात जमा होणार..

SCROLL FOR NEXT