nijampur
nijampur 
उत्तर महाराष्ट्र

लोकसहभागातून साकारलेल्या 'घटबारी'ला प्रांताधिकाऱ्यांची भेट

​प्रा. भगवान जगदाळे

​निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) :​ ​खुडाणे (ता.साक्री) परिसरातील घटबारी धरणाला शनिवारी (ता.9) दुपारी प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी भेट देत पाहणी केली. धरणातील जलसाठा पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. खुडाणेचे सरपंच प्रतिनिधी पराग माळी, उपसरपंच नामदेव गवळे आदींसह ग्रामस्थांशी त्यांनी चर्चा केली.​

यावेळी त्यांच्यासह निजामपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक दिलीप खेडकर, प्रा.अजय चांडक, डिजिटल शाळा प्रणालीचे अभियंता हर्षल विभांडीक, मंडळाधिकारी श्री. चित्ते, तलाठी श्री. रोजेकर, संरपच प्रतिनिधी पराग माळी, उपसंरपच नामदेव गवळे, माजी सरपंच धनराज माळी, ग्रामपंचायत सदस्य कन्हैयालाल काळे, महेंद्र हेमाडे, पांडुरंग महाले, मोहन ब्राम्हणे, शाना देवरे, शरद भारत गवळे, दिनेश गवळे, गणेश गवळे, रोजगार सेवक मनोज माळी आदी उपस्थित होते.

​घटबारी धरणातील जलसाठा पाहून श्री. मिसाळ यांनाही मोबाईलमध्ये सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही. यावेळी बोलताना ते म्हणाले की, "खुडाणे ग्रामस्थांनी लोकसहभागातून साकारलेले हे काम खरोखरच उल्लेखनीय असून राज्यातील या आदर्श कार्याचे आपण नेहमी इतरत्र उदाहरण देत असतो." अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.​

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT