उत्तर महाराष्ट्र

ॲम्बुलसन मिळाली नाही..म्हणून कचरा गाडीतून न्यावा लागला मृतदेह

चंद्रकांत घरटे

 सामोडे : सामोडे येथे एका ज्येष्ठ नागरिकाची अंत्यविधीसाठी ॲम्बुलसच्या दहा तासाच्या प्रतीक्षेनंतर ॲम्बुलन्स न मिळाल्याने अखेर मृतदेहाची कचरा गाडीतून काढली प्रेत यात्रा नेण्याची वेळ आली.

 
सामोडे(ता.साक्री) येथील त्र्यंबक विष्णू ठाकूर या 70 वर्षीय जेष्ठाचा मृत्यू रात्री 2 वाजेच्या सुमारास झाला . ठाकूर कोरोना पॉझिटीव्ह होते. ते मालेगाव येथे उपचार घेत होते. त्यांना रात्री आठ वाजता त्यांच्या घरी सामोडे येथे आणले होते. उपचारां दरम्यान त्याचा रात्री दोन वाजता मृत्यू झाला.कोरोना नियमाप्रमाणेच त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचे ठरले . त्यांना स्मशानभूमी पर्यंत नेण्यासाठी वेळोवेळी फोन करून दहा तास च्या प्रतीक्षेत नंतरही ॲम्बुलन्स येत नसल्याने त्यांना ग्रामपंचायतीमार्फत कचरा गोळा करण्याचे गाडीतून मोठ्या जड अंतकरणाने, नातेवाईकांनी पीपीई किट घालून कचरा गाडीतून त्र्यंबक ठाकुर यांचा देह स्मशान भूमीत नेला आणि मोजक्या लोकात अंत्यसंस्कार केले. कै. ठाकूर यांना दोन मुलं , दोघेही मुले पेशाने शिक्षक, दोन सुना, एक मुलगी ,नातवंडअसा त्यांचा परिवार आहे.  
 

आता ॲम्बुलन्सचा तुटवडा 
कोरोणाच्या महामारीचा दवाखान्यांमध्ये ऑक्‍सिजनचा तुटवडा, ॲम्बुलन्सचा तुटवडा, दवाखान्यात बेडचा तुटवडा अशा अनेक गोष्टींचा सामना लोकांना करावा लागतो आहे याचं येथे प्रत्यक्ष उदाहरण सामोडेकरांनी अनुभवलं .वरील सर्व बाबींची तुटवडा होऊ नये व असा प्रसंग दुसरा ओढवू नये यासाठी शासनाने ठोस पावले उचलावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT