Dhule Police 
उत्तर महाराष्ट्र

धुळे पोलिसांनी कर्णकर्कश सायलेन्सर रोलरखाली तुडवले

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ध्वनिप्रदूषण करणारे कर्णकर्कश हॉर्न वापरणाऱ्या सात वाहनधारकांवर कारवाई झाली.

सकाळ डिजिटल टीम

धुळे : फटाक्यांसारखा आवाज करणाऱ्या बुलेट (Bullet) आणि फॅन्सी नंबर प्लेटद्वारे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात जिल्हा पोलिस (Dhule Police) प्रशासनाने धडक कारवाई हाती घेतली आहे. त्यामुळे बेजार धुळेकरांना दिलासा मिळू शकेल. त्यात शहर वाहतूक शाखेने दादा, काका, राजे, अण्णा, मामांना (फॅन्सी नंबर प्लेट) कारवाईतून जोरदार झटका दिला. त्यात जप्त कर्णकर्कश २९ सायलेन्सरसह (Silencer) विचित्र आकारातील ३२ नेमप्लेट शुक्रवारी (ता.२०) संतोषी माता चौकात रोडरोलर फिरवून चक्काचूर केल्या.


बुलेटचा सायलेन्सर बदलून फटाक्यांसारखा मोठा आवाज करत ध्वनिप्रदूषण करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा आदेश पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी दिला. नंतर काही दिवसांपासून वाहतूक पोलिसांनी अशा वाहनचालकांवर कारवाई सुरू केली. त्यात २९ बुलेटधारकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई झाली. त्यांचे मॉडिफाइड सायलेन्सर शहर वाहतूक शाखेत जमा केले. तसेच काही वाहनधारक नियमाप्रमाणे नंबर प्लेट न लावता फॅन्सी नंबर प्लेट लावल्याचे आढळले. अशा अनधिकृत ३२ नंबर प्लेट्स वाहनचालकांवर कारवाई झाली.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ध्वनिप्रदूषण करणारे कर्णकर्कश हॉर्न वापरणाऱ्या सात वाहनधारकांवर कारवाई झाली. २९ मॉडिफाइड सायलेन्सर, ३२ फॅन्सी नंबर प्लेट, ७ म्युझिकल हॉर्न पोलिस अधीक्षकांच्या आदेशान्वये शुक्रवारी सकाळी संतोषीमाता चौकातील रस्त्यावर रांगेत मांडून त्यावरून रोड रोलर फिरवला. पोलिस अधीक्षक पंडित, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक धीरज महाजन, सहाय्यक पोलिस निरीक्षक संगीता राऊत, उपनिरीक्षक रामदास जाधव व शहर वाहतूक शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.


५४ लाखांचा दंड वसूल
जानेवारी ते जुलै २०२१ अखेरपर्यंत शहर वाहतूक शाखेने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३३ हजार २०० वाहनचालकांवर कारवाई करत ५४ लाख ९४ हजाराचे रोख तडजोड शुल्क वसूल केले. शुल्क वसुलीसाठी वाहनधारकांना नोटीस पाठविल्या. ही कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT