cannabis sellers arrest 
उत्तर महाराष्ट्र

धुळ्यात कारमधून गांजाची वाहतूक;सापळा रचून पोलिसांची कारवाई

Dhule Crime News: पोलिसांनी कारची तपासणी केली असता डिक्कीत १८ किलो ओला गांजा मिळून आला.

सकाळ डिजिटल टीम

धुळे : शहरात गांजा विक्रीसाठी (cannabis sellers) आलेल्या दोघांना शहर पोलिसांनी (Dhule City Police) सूरत बायपासवर सापळा रचत पकडले. त्यांच्याकडून पाच लाखांची कार व ९३ हजारांचा ओला गांजा जप्त केला. संशयित दोघांविरोधात गुन्हा दाखल केला.


शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांना शहरात हिरे मेडिकल कॉलेजजवळ सुरत बायपासवरील पुलाखाली दोन व्यक्ती कारमधून (एमएच १८ बीसी २८३२) गांजाची वाहतूक करून त्याच्या चोरट्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार कारवाईसाठी पथक तयार केले. पथकाने दुपारी तीनच्या सुमारास घटनास्थळी छापा टाकत कारवाई केली. कारचालक संशयित कुणाल दिलीप बिडगर (वय २६, रा. गुजर खर्दे, ता. शिरपूर) व हर्षवर्धन गोकूळ जगदाळे (वय २१, रा. मोगलाई, कोंडाजी विजय व्यायामशाळेजवळ, धुळे, ह. मु गुजर खर्दे, ता. शिरपूर) यांना पकडले. कारची तपासणी केली असता डिक्कीत १८ किलो ओला गांजा मिळून आला. त्याची किंमत ९३ हजार ३७० रुपये आहे. गांजा व पाच लाखांची कार, असा पाच लाख ९३ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, सहाय्यक पोलिस निरीक्षक दादासाहेब पाटील, संतोष तिगोटे, श्रीकांत पाटील, नाना आखाडे, नितीन अहिरे, भिका पाटील, मुक्तार मन्सूरी, प्रल्हाद वाघ, मनीष सोनगिरे, तुषार मोरे, पंकज खैरमोडे, प्रसाद वाघ, गुणवंत पाटील, प्रवीण पाटील, विवेक साळुंखे, नीलेश पोतदार, अविनाश कराड, शाकीर शेख यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: महत्वाच्या विषयांवर फडणवीसांची भेट घेतली- राज ठाकरे

Reels addiction Impact on Brain: रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT