gramsevak yamraj 
उत्तर महाराष्ट्र

Video गावात आले यमराज...अन्‌ म्हणताय मृत्यूदंडाची शिक्षा द्या! 

अंबादास बेनुसकर

देशशिरवाडे : "जो निघेल घराच्या बाहेर, त्याला मी देतो कोरोना'चा दम... मी आहे यम, मी आहे यम, मी आहे यम! चित्रगुप्त...जी महाराज...गावात विनाकारण मोकाट फिरणाऱ्यांच्या नोंदी ठेवा. यमदूत...जी महाराज... तुम्ही त्याचा अहवाल तातडीने सादर करून "त्यांना' मृत्युदंडाची शिक्षा द्या. आ ऽऽहाहाहा....आ ऽऽ हाहाहा....असा संवाद कानी पडताच चिकसे आणि जिरापूर वासीयांच्या काळजात धस्सं होतं. 

गरज नसताना खरच आपण घराबाहेर पडायला नको. नाहीतर उगाच कोरोनाची शिकार होऊन मृत्यूला जवळ करू, अशी धास्ती मनात निर्माण होते. सुमारे वीस मिनिटांच्या या पथनाट्यातून कोरोनाबाबत अनोखी जनजागृती घडून येत असून त्यांना गटविकास अधिकारी जे. टी. सूर्यवंशी, सरपंच कल्पना माळी, उपसरपंच संजय जगताप, पंचायत समिती सदस्य अजय सूर्यवंशी, सागर मोहिते, गणेश जैन, सचिन बर्डे व शरद बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली चिकसे- जिरापूर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक पंकज पगारे, ग्रामपंचायत कर्मचारी दिगंबर खैरनार रंगकर्मी...सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे ग्रामसेवक पंकज पगारे स्वत: यमराजाची तर चित्रगुप्ताची भूमिका दिगंबर खैरनार यांनी साकारली आहे. 

अशी होते एंट्री अन्‌ चुकतो काळजाचा ठोका 
रिक्षावर ध्वनिक्षेपक लावून अफलातून वेशभूषा साकारलेले हे पथनाट्य गल्लोगल्लीत गेल्यानंतर गावकरी घराच्या खिडकीतूनच बघून त्याला दाद देतात. केल्या कर्माचा हिशेब ठेवणारा चित्रगुप्त, त्याची इत्यंभूत माहिती यमराजाला देणारा यमदूत आणि त्यावर अंतिम निर्णय घेत शेवटची बोलावणी करणारा यमराज. हे सारे नाटिकेतून काल्पनिक वाटत असले तरी त्याची नुसती कल्पनाही काळजाचा ठोका चुकवते. कोरोनाच्या काळात चुकीचे काम करणाऱ्यांना या नाटिकेतून एक प्रकारे संदेश देण्याचे अनोखे कार्य या तिन्ही शासनाच्या सेवकांनी हाती घेतले आहे. त्यामुळे सदर पथनाट्य परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. 

पथनाट्यातून ग्रामस्थांचे प्रबोधन 
"कोरोना'ला हद्दपार करण्यासाठी केंद्र शासन, राज्य शासन, जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, महसूल, पोलीस कर्मचारी सर्वच दिवस- रात्र मेहनत करत असताना सर्वसामान्यांनी त्याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे ग्रामस्थांना नाटकातून प्रबोधन करत सोशल डिस्टसिंग, मास्क वापरणे, हॅंन्ड सॅंनीटाईज, कोरोनाची भयानकता लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला आहे. 
- पंकज पगारे, ग्रामसेवक, चिकसे जिरापूर.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : मराठी माणसाच्या आनंदाला 'रुदाली' म्हणणं ही हिणकस अन् विकृत प्रवृत्ती; उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना सुनावलं...

Latest Maharashtra News Updates : पुण्यात शिवसेना महानगर प्रमुखाचे पोस्टर फाडले

Guru Purnima: या गुहेत ऋषी वेदव्यासांचं वास्तव्य? पुराणकथांना मिळतोय पुरावा!

Video : अजगर आहे की खेळणं? 15 फुटाच्या अजगरासोबत गावकऱ्यांनी बनवल्या रील्स, थरारक व्हिडिओ व्हायरल..

Maharashtra Rain: पालघरला पावसाने झोडपले! नदीला पूर, धरणाचे 5 दरवाजे उघडले, हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT