anil gote 
उत्तर महाराष्ट्र

आंदोलन करणारे अनिल गोटेंना आले चक्‍कर

सकाळवृत्तसेवा

धुळे : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे शिरपूर येथे आज (8 डिसेंबर) आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी झालेले राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार अनिल गोटे यांना चक्कर आली.

केंद्रातील भाजप सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकाच्या विरोधात आज भारत बंदची हाक पुकारत आंदोलन पुकारण्यात आले होते. यात विविध राजकीय पक्षांसह शेतकऱ्यांचा देखील सहभाग होता. राज्यात महाविकास आघाडीतर्फे ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत होते. दरम्‍यान राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे शिरपूर येथे आज आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात माजी आमदार गोटे हे कार्यकर्त्यांसह सहभागी झाले होते. आंदोलनात सहभागी झाल्‍यानंतर गोटे यांना अचानक चक्कर आली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली.  

यापुर्वीही असा प्रकार
माजी आमदार अनिल गोटे यांना कार्यक्रमामध्ये चक्कर येऊन त्यांची तब्येत बिघडल्याची घटना यापुर्वी देखील घडली आहे. आज पुन्हा एकदा अनिल गोटे हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आंदोलनादरम्यान नेतृत्व करत असताना शिरपूर येथे चक्कर येऊन त्यांची तब्येत खालावली. परंतु अनिल गोटे यांच्यावर तत्काळ प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्यावर छगन भुजबळ का बोलत नाहीत? स्वत:च भुजबळांनी सांगितलं कारण

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन दगडूशेठच्या दर्शनाला

Satana News : बागलाणमध्ये सरसकट पीक पंचनाम्यांची मागणी; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा तहसीलदारांना घेराव

Farmer Rasta Roko : विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग; वाहतूक विस्कळीत

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरणात शिवसेना पदाधिकारींच्या अडचणी वाढणार?

SCROLL FOR NEXT