shiv sena shiv sena
उत्तर महाराष्ट्र

निगरगट्ट यंत्रणांविरोधात शिवसेना आक्रमक !

भूमिगत गटार योजनेचे काम अतिशय निकृष्ट, नियोजनशून्य सुरू आहे. ठेकेदारावर कुणाचाही अंकुश नाही.

निखिल सुर्यवंशी


धुळे : शहरवासीयांमार्फत जीवघेण्या खड्ड्यांचा प्रश्‍न ऐरणीवर येऊनही एमआयएमचे आमदार (MLA), भाजपचे खासदार (BJP MP) व महापौर (Mayor), राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी (Political Leader) आणि अधिकारीवर्गाने ‘हाताची घडी, तोंडावर बोट’ ठेवणे पसंत केले आहे. काही पक्ष, संघटनांनी यंत्रणांना निवेदन दिले; पण प्रभाव कमी पडल्याने खड्ड्यांचा (Bad road) प्रश्‍न ‘जैसे थे’ आहे. हा नागरी जिव्हाळ्याचा प्रश्‍न हाती घेऊन शिवसेनेने (Shiv sena) निगरगट्ट यंत्रणांविरोधात संघर्षाचा पवित्रा घेतला आहे. (shiv sena is aggressive against bad roads in dhule city)

सव्वा लाखावरील लोकसंख्येच्या देवपूर भागातून जुना मुंबई-आग्रा महामार्ग जातो. या मार्गाच्या एका बाजूस महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नियंत्रणात भूमिगत गटार योजनेचे काम सुरू आहे. या मार्गाची मालकी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. पावसाळा येऊन ठेपला; पण कुठल्याही यंत्रणेला या मार्गावरील धोकेदायक खड्डे बुजवावेसे वाटले नाहीत. कामाची बिले काढण्यात जशी तत्परता दाखविली जाते, तशी ती खड्डे बुजविण्यात दिसून आली नाही. या स्थितीकडे लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष असल्याने धुळेकरांमध्ये मोठा रोष आहे.

शिवसेनेकडून अधिकारी धारेवर
शिवसेनेने मात्र खड्ड्यांप्रश्‍नी निगरगट्ट यंत्रणांविरोधात आक्रमक होत उदासीन अधिकारी, ठेकेदाराविरोधात संघर्षाचा पवित्रा घेतला आहे. याअंतर्गत जीवन प्राधिकरणाच्या देवपूरमधील कार्यालयात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (ता. १६) दीड तास ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी केली. अधिकाऱ्याला धारेवर धरले. भूमिगत गटार योजनेचे काम अतिशय निकृष्ट, नियोजनशून्य सुरू आहे. ठेकेदारावर कुणाचाही अंकुश नाही. त्यामुळे रस्त्यांची वाट लागली आहे. तरीही जीवन प्राधिकरण, महापालिका ढिम्म आहे. त्यात ठेकेदाराला पाठीशी घातले जात असल्याने तो मुजोर झाल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.


प्रत्यक्ष कामाची स्थिती लक्षात घेऊन बिल देणे आवश्यक आहे. मात्र कार्यालयात बसून ते दिले जातात. १४२ किलोमीटरची भूमिगत गटार योजना असून, पैकी १४ किलोमीटरचे काम पूर्ण झाल्याचे अधिकारी सांगतात. तसेच ६० किलोमीटरचे रस्ते दुरुस्ती करणे आवश्यक असताना थातूरमातूर कामे केली जातात. त्यामुळे प्राधिकरणाने जीवघेण्या खड्ड्यांची, रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, सहसंपर्कप्रमुख अतुल सोनवणे, महानगरप्रमुख मनोज मोरे, प्रफुल्ल पाटील, माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र पाटील, समन्वयक गुलाब माळी, संदीप चव्हाण, संदीप सूर्यवंशी, बबन थोरात, पंकज भारस्कर, संजय वाल्हे, सचिन बडगुजर, ललित माळी, एजाज हाजी, केशव माळी, भटू गवळी, मच्छिंद्र निकम, शरद गोसावी, शोएब मिर्झा आदींनी आंदोलनावेळी दिला.


टाळे लावून अधिकाऱ्यांना कोंडणार

देवपूरमधील महामार्गासह खड्डे दुरुस्ती पंधरा दिवसांच्या आत झाली नाही, तर जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयाला कुलूप ठोकून काम बंद पाडले जाईल, अधिकाऱ्यांना फिरू देणार नाही, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माळी, महानगरप्रमुख मोरे, पाटील यांनी दिला.


लवकर काम पूर्ण करू : मजिप्रा
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता डी. ए. कुलकर्णी हे शिवसेनेच्या आंदोलकांना म्हणाले, की पंधरापैकी ११ ते १२ रस्त्यांची डागडुजी पूर्ण झाली आहे. काही रस्त्यांची दुर्दशा, खड्ड्यांची स्थिती लवकर दुरुस्त करू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT