उत्तर महाराष्ट्र

सोनगीरः हरविलेला सोन्याचा नेकलेस..पून्हा मिळाला परत

कुटुंब व विवाहित मुलीसह जेवणाला दुपारी साडेअकराच्या सुमारास स्वागत हाॅटेलमध्ये आले.

एल. बी. चौधरी

सोनगीर : येथील हॉटेल (Hotel) स्वागतचे मालक मोतीलाल कौतिक माळी यांनी एका महिलेचा दीड लाख रुपये किमतीचा सापडलेला सोन्याचा नेकलेस (Gold necklace) परत करून प्रामाणिकपणाचा एक आदर्श घालून दिला.


येथील मुंबई आग्रा महामार्गालगत मोतीलाल माळी यांचा ढाबा आहे. ते जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देखील आहेत. शनिवारी (ता. 23 ) त्यांच्या ढाब्यावर शहादा येथील सुभानराव बापू पाटील कुटुंब व विवाहित मुलीसह जेवणाला दुपारी साडेअकराच्या सुमारास स्वागत हाॅटेलमध्ये आले. जेवण झाल्यावर बील देऊन परत जाताना श्री. पाटील यांच्या मुलीचा नेकलेस खाली पडला. ते निघून गेल्यावर मालक माळी यांना नेकलेस दिसला. तो नेकलेस कोणाचा असावा हा अंदाज त्यांना आला होता. मात्र ते कोण, कुठले हे माहित नसल्याने संपर्क होऊ शकला नाही.

दुपारी चारच्या सुमारास त्यांना दुरध्वनी आला. आणि नेकलेस हरवल्याची व सापडला किंवा कसे याबाबत श्री. पाटील यांचेकडून विचारणा झाली. श्री. माळी यांनी त्यांना धीर देत नेकलेस सुरक्षित असल्याचे सांगितले. सायंकाळी श्री. पाटील व त्यांची मुलगी हाॅटेलवर आले. श्री. माळींनी त्यांना त्यांची वस्तू परत दिली. असा प्रामाणिकपणा पाहून श्री. पाटील यांनी धन्यवाद दिले. जगात प्रामाणिक लोक आहेत म्हणून लोकांचा विश्वास कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT