उत्तर महाराष्ट्र

एसटी चालक, शिक्षकाची अशीही गांधीगिरी; कुदळ-फावडे घेऊन उतरले रस्त्यावर 

विनोद शिंदे

कुसुंबा ः नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील फागणे ते नवापूरदरम्यानचे काम अनेक दिवसांपासून ठप्प झाले आहे. काही ठिकाणी संथगतीने सुरू आहे. हा महामार्ग खड्ड्यांमुळे मृत्यूचा सापळा बनला आहे. वाहनधारकांना होणारा त्रास पाहता धुळे आगाराचे एस टी चालक, शिक्षकाने गांधिगीरी करत स्वःता पुढाकार घेत मुरूमद्वारे कुदळ फावडे घेत हे खड्डे बुजविण्याचे काम केले.

फागणे ते नवापूर सीमेपर्यंत १४० किलोमीटरदरम्यान वाहनचालकांना खड्डे टाळण्यासाठी कसरत करावी लागत आहे. अपघातही होत आहेत. महामार्ग प्राधिकरणाने काम दिलेल्या कंपनीकडून तात्पुरती मलमपट्टी करण्यात येते. मात्र, आठवडाभरात स्थिती जसै-थे होते.धुळे, मोराणे, आनंदखेडे, कुसुंबा, नेर, साक्रीदरम्यान मोठमोठे खड्डे पडले आहेत व धूळही उडत आहे.

आणि हाती घेतले कुदळ. फावडा

कुसुंबा व धुळे आगारातील चालक सुनील शिंदे व उषा प्रकाश प्रतिष्ठानचे तथा माध्यमिक शिक्षक रणजित शिंदे यांनी गांधीगिरी करीत कुसुंबा बायपासजवळील मोठा खड्डा प्रवाशांचा डोकेदुखी ठरत असल्याने स्वतः कुदळ-फावडे घेत जवळच पडलेल्या ढिगाऱ्यांतून मुरूम घेत खड्डे बुजविले. यामुळे अनेकांनी कौतुकही केले, तर काहींनी खड्डे बुजविण्यास सहकार्यही केले.

गांर्भियाने लक्ष देण्याची गरज 

महामार्ग प्राधिकरणाने गांभीर्य लक्षात घेऊन कामाची गती वाढवून महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करावे, अशा प्रतिक्रिया वाहनधारकांसह ग्रामस्थांनी व्यक्त करत आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT