उत्तर महाराष्ट्र

कोरोनाबाबतचे सर्वेक्षण "नावालाच'...वरिष्ठ अधिकाऱ्यांची उडवाउडवी ! 

सकाळवृत्तसेवा

धुळे ः कोरोना विषाणू संसर्गाचा धोका टाळण्यासाठी महापालिकेने आजपासून घरोघरी जाऊन कुटुंब सर्वेक्षण सुरू केले खरे पण या सर्वेक्षणाबाबत संबंधित वरिष्ठ अधिकारीच उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे आज पाहायला मिळाले. दिवसभराच्या सर्वेक्षणातून कुणी संशयित रुग्ण आढळला तर काय या प्रश्‍नावर आरोग्य विभागातील अधिकारी एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याचे पाहायला मिळाले. रोजच्या रोज माहिती संकलन व त्यानुसार लगेचच कार्यवाही होणार नसेल तर या सर्वेक्षणाचा उपयोग काय असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होतो. 

कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी संशयित रुग्णांची माहिती तत्काळ मिळावी या अनुषंगाने महापालिकेने आजपासून कुटुंब सर्वेक्षण सुरू केले. यासाठी 228 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांनी आजपासून सर्वेक्षण सुरू केले. मात्र, दिवसभरात किती घरांचे सर्वेक्षण झाले, या सर्वेक्षणातून कुणी संशयित आढळून आला का याबाबतची माहिती संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना देता आली नाही. 

मग उपयोग काय ? 
एका अधिकाऱ्याने तर सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर कार्यवाही होईल असे उत्तर दिले. जर अशीच कार्यवाही होणार असेल तर कोरोनाच्या अनुषंगाने होणाऱ्या या सर्वेक्षणाचा उपयोग काय असा प्रश्‍न उपस्थित होतो. 

डॉक्‍टरांचे एकमेकांकडे बोट 
दररोजच्या सर्वेक्षणातून संशयित रुग्णांबाबतचे रिपोर्टींग होणे गरजेचे आहे. तसे झाले तरच या सर्वेक्षणाला अर्थ आहे. याबाबतचे रिपोर्टींग कुणाकडे आहे असे विचारले असता आरोग्याधिकारी डॉ. महेश मोरे यांनी डॉ. जे. सी. पाटील यांचे नाव सांगितले तर डॉ. पाटील यांनी आपल्याकडे अशी जबाबदारी नसल्याचे म्हणत डॉ. मोरेंकडे बोट दाखविण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे, सर्वेक्षणासाठी मात्र कर्मचारी घरोघरी जात आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT