dhule gandul praklp 
उत्तर महाराष्ट्र

"कायम'स्वरूपी की "परीक्षे'पुरता! 

सकाळ वृत्तसेवा

धुळे : महापालिकेच्या गांडूळ खत प्रकल्पाच्या ठिकाणी सध्या विविध कामे झाल्याची दिसून येतात. महापालिकेने केलेली ही कामे अभियान, मोहिमेपुरती की कायमस्वरूपी हा मात्र प्रश्‍न आहे. दरम्यान, हा प्रकल्प पुन्हा एकदा सुरू करण्याचा प्रयत्न महापालिकेच्या वरिष्ठांकडून सुरू आहे. त्यासाठी चोवीस तास वीजपुरवठा व पाण्याच्या व्यवस्थेसह विविध बाबींची पूर्तता करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

शहरातून संकलित कचऱ्यापासून गांडूळ खतनिर्मितीसाठी एक ते दीड कोटी रुपये खर्च करून वरखेडी रोडवर प्रकल्प सुरू केला होता. सुरवातीचे काही वर्ष ज्या कंपनीने प्रकल्प उभारला त्याच कंपनीने तो चालवला. त्यानंतर आस्था कंपनीला हे काम देण्यात आले. मात्र, 2014 नंतर बिल अदायगीच्या प्रश्‍नावरून हा प्रकल्प बंद झाला. दरम्यानच्या काळात स्वच्छता अभियान, स्वच्छ सर्वेक्षण, घनकचरा व्यवस्थापन आदी विविध अभियानाच्या निमित्ताने प्रकल्प सुरू करण्याचा देखावा केला गेला मात्र, प्रत्यक्षात तो पूर्ण क्षमतेने सुरू झाला नाही. 

पुन्हा लगबग सुरू 
प्रकल्पासाठी नियमित वीजपुरवठ्यासह विविध अडचणी होत्या, त्या आता दूर करून प्रकल्प सुरू करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. चोवीस तास वीजपुरवठा असेल यासाठी विजेचे पोल, डीपी बसविण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर आता प्रकल्पाच्या ठिकाणी विद्युत संच मांडणी, दुरुस्ती, बोअरवेल, वॉटर टॅंकची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी महापालिकेने आठ लाख 72 हजार 877 रुपयांची निविदा काढली आहे. 

तात्पुरती कामे नको 
गांडूळ खत प्रकल्पावर सद्यःस्थितीत कंपोस्ट बीन, कचरा वर्गीकरणासाठी व्यवस्था, वेट वेस्ट प्रोसेसिंग युनिट, ड्राय वेट प्रोसेसिंग युनिट आदींचे फलक लावलेले दिसतात. ही सर्व टापटीप समित्यांच्या दौऱ्यापुरती आहेत की कायमस्वरूपी हा मात्र प्रश्‍न आहे. दरम्यान, गांडुळ खत प्रकल्प कायमस्वरूपी सुरू राहावा यासाठी आयुक्‍त अजीज शेख, उपायुक्त गणेश गिरी हे आग्रही असल्याचे सूत्रांकडून समजते. त्यांच्या या अपेक्षेला खालची यंत्रणा किती प्रतिसाद देते यावरच या प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून असेल. 
 
गांडूळ खत विक्रीचा प्रश्‍न 
महापालिकेच्या गांडूळ खत प्रकल्पावर यापूर्वी तयार केलेल्या खताची विक्री झालेली नाही. महाराष्ट्र शासनाने या खताला "हरित महासिटी कंपोस्ट' हा ब्रॅण्ड वापरण्याची परवानगी दिली आहे. या ब्रॅण्डचा वापर करूनही खताची विक्री होत नाही. सद्यःस्थितीतही 50 किलो खताच्या 500 गोण्या तयार करून ठेवल्या आहेत. या खताला ग्राहक कधी मिळतील हा मात्र प्रश्‍नच आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT