devpur dhule robry
devpur dhule robry 
उत्तर महाराष्ट्र

"आम्ही पुन्हा-पुन्हा येऊ...'! 

सकाळ वृत्तसेवा

धुळे : पुढारी, पोलिस, न्यायालयनी कर्मचारी, व्यापारी, अशा समाजातील विविध घटकांची घरे "टारगेट' केल्यानंतर चोरट्यांनी आता सीमेवरील जवानांच्या घरांकडे मोर्चा वळविला आहे. यात सशस्त्र चोरट्यांनी वलवाडी शिवारातील अक्षय कॉलनीत दागदागिन्यांसह सव्वा लाखाची घरफोडी केली, तर महिंदळे शिवारातील मीनाई कॉलनीत घरफोडीतून 80 हजारांचा ऐवज लांबविला. या दोन्ही घरफोड्यांमध्ये सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल चोरीस गेला. 
शिकलकर टोळी जेरबंद केल्यानंतर पोलिसांनी सोडलेला सुटकेचा निःश्‍वास अवघ्या काही तासांपुरताच ठरला. शिकलकड टोळीनंतर आता "चड्डी- बनियान' गॅंगमधील चोरट्यांनी सुस्तावलेल्या पोलिसांना पुन्हा जागे करत "आम्ही पुन्हा-पुन्हा येऊ' अशीच वर्दीच जणू दिली आहे. वलवाडी परिसरातील घरफोडीत सीसीटीव्ही फुटेजमधे "चड्डी बनियान' गॅंगचे चार चोरटे कैद झाले आहेत. 
शहरातील देवपूरमधील वलवाडीत शिवारात अक्षय कॉलनीत प्लॉट क्रमांक 15 मध्ये नीताबाई नेमीचंद पाटील (वय 29) यांचे वास्तव्य आहे. त्यांचे पती सैन्य दलात कार्यरत आहेत. श्रीमती पाटील बाहेरगावी गेल्याने त्यांचे घर बंद होते. काल (ता. 1) मध्यरात्रीनंतर त्या घरी परतल्या असता घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी दरवाजाबाहेरील लोखंडी दरवाजाचा कडी- कोयंडा व मुख्य लाकडी दरवाजाची कडी कापून आत प्रवेश केला. घराच्या पहिल्या मजल्यावरील बेडरूममधील कपाट फोडले. कपाटातील चार तोळ्यांची सोन्याची पट्टीची माळ, सात हजारांची चांदीची लक्ष्मीची मूर्ती, 25 हजारांची रोकड असा एकूण एक लाख 32 हजारांचा ऐवज लंपास केला. सोन्याची आजच्या बाजारभावानुसार किंमत लक्षात घेतल्यास चोरट्यांनी दोन लाखांचा मुद्देमाल नेला. नीताबाई पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला असून, हवालदार शेख तपास करीत आहेत. 

"सीसीटीव्ही'त चार चोरटे कैद 
श्रीमती पाटील या घरी आल्यानंतर आज पहाटे पश्‍चिम देवपूर पोलिसांना माहिती दिली. पश्‍चिम देवपूर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. पाटील यांच्या घराजवळील महेश पाटकर यांनी घराबाहेर लावलेल्या "सीसीटीव्ही'त चौघे चोरटे कैद झाले. यात चड्डी बनियानमधील चार चोरट्यांनी घरफोडी केल्याचे दिसून येत आहे. 

महिंदळे येथे घरफोडी 
साक्री रोडवरील महिंदळे येथील मीनाई कॉलनीत शिवणकाम करणाऱ्या सविता अधिकार पाटील (वय 38) यांचे वास्तव्य आहे. 30 नोव्हेंबरला त्या बाहेरगावी गेल्याने त्यांचे घर बंद होते. काल (ता. 1) सकाळी सातच्या सुमारास घरात चोरी झाल्याचे उघडकीस आले. चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचा कडी- कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटातून 40 हजारांची रोकड, 12 ग्रॅमची सोन्याची मंगलपोत असा एकूण 47 हजारांचा ऐवज लंपास केला. मंगलपोतची किंमत आजच्या बाजारभावानुसार 45 हजारांवर असून एकूण 80 हजारांवर ऐवज चोरट्यांनी नेला. सविता पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार धुळे तालुका पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला. 

चोरटे झाले पुन्हा सक्रिय 
शहरासह जिल्ह्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर चोरटे पुन्हा सक्रिय झाले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल होऊनही त्यावर प्रतिबंध करण्यास किंवा गस्त वाढवून चोरट्यांना पकडण्यात पोलिस अपयशी ठरत आहेत. वाढत्या घटनांनी नागरिकांमध्ये मात्र भीती व्यक्त होत असून, पोलिसांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suchrita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

घर का न घाट का... उन्मुक्त चंदच ड्रीम झालं उद्ध्वस्त! गुजराती खेळाडू बनला World Cupमध्ये अमेरिकन संघाचा कर्णधार

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT