उत्तर महाराष्ट्र

धुळे ब्रेकिंग : जिल्ह्यात आणखी तीन कोरोना "पॉझिटिव्ह'; साक्री, शिरपूरला जखडले

सकाळवृत्तसेवा

धुळे ः संसर्गजन्य "कोरोना व्हायरस'ने जिल्ह्याला घेरले असून, धुळे शहर "हॉट स्पॉट' बनू लागले आहे. त्यासह जिल्ह्यात आज (शुक्रवार) सकाळी तीन पाॅझिटिव्ह रूग्ण आढळले. ही चिंताजनक स्थिती पाहता नागरिकांनी घरातच राहावे, असे आवाहन आहे. एक पुरूष व दोन महिला, असे तीन नव्याने पाॅझिटिव्ह आढळल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची एकूण संख्या 19 झाली आहे.

धुळे शहरात आता एकूण 14 बाधित झाले असून, तिघांचा मृत्यू झाला आहे. साक्री शहर, बाह्मणे (ता. शिंदखेडा), आमोदे (ता. शिरपूर) येथे प्रत्येकी एक रूग्ण होता. आता साक्री शहर व आमोदे येथे प्रत्येकी दुसरा कोरोनाग्रस्त रूग्ण आढळला आहे. यात दोन्ही महिला आहेत. कोरोना बाधित क्षेत्रात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची सूचना तालुका प्रशासनासह महापालिकेला मिळाली आहे. 

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 16 वरून 19 झाली आहे. पैकी पूर्वी साक्रीतील एक व धुळे शहरातील तीन, अशा एकूण चौघांचा मृत्यू झाला आहे. 


तपासणी अहवालांची स्थिती
येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात गुरूवारी दिवसभरात 13 जणांच्या शरीरातील नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. तपासणीअंती पॉझिटिव्ह आलेले 11 रुग्ण सध्या रुग्णालयात दाखल आहेत. अद्याप 52 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत धुळे शहरासह जिल्ह्यातील 16 जणांचे अहवाल आज सकाळी प्राप्त झालेल्या माहितीनुसार "पॉझिटिव्ह' आहेत. सर्वोपचार रुग्णालयात 64 जणांचे "थर्मल स्कॅनिंग' झाले. 22 जणांना होम क्वारंटाइनचा सल्ला देण्यात आला आहे. आजअखेर 485 जणांच्या शरीरातील नमुन्यांची तपासणी झाली. तसेच चार हजार 849 जणांची थर्मल स्कॅनिंग झाले. अधिष्ठाता डॉ. एन. एन. रामराजे, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार सूर्यवंशी यांच्यासह वैद्यकीय अधिकारी आढावा घेत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोण होणार पश्चिम बंगालचा नवा मुख्यमंत्री कोण? ममतांच्या एकेकाळच्या सहकाऱ्यासह ३ नावं चर्चेत, अमित शहांनी...

Thalapathy Vijay : थलपती विजयची ऐतिहासिक विजयाकडे कूच अन् Jofra Archer च्या जुन्या ट्विटचा इंटरनेटवर धुमाकूळ

Assembly election results 2026 Live Update : पश्चिम बंगालमध्ये कमळ फुललं, जनशक्तीचा विजय : PM मोदी

Love Numerology : 'या' 2 मुलांकाचे लोक प्रेमात होतात अयशस्वी; हार्ट ब्रेकमुळे बनतात प्रचंड स्ट्रॉन्ग, जीवनात मिळवतात मोठं यश

West Bengal Result: बंगालचा विजय अचानक नाही! २०१४ मध्येच लिहिलेली विजयाची स्क्रिप्ट; १२ वर्षांचा ‘मास्टर प्लॅन’ हिट, वाचा इनसाइड स्टोरी

SCROLL FOR NEXT