tomato
tomato 
उत्तर महाराष्ट्र

टोमॅटोला चढली लाली

जगन्नाथ पाटील

कापडणे (धुळे) : लॉकडाऊनमुळे एप्रिल व मे मधील लग्नसराई बासनात गुंडाळली गेली. याचा परीणाम बाजारपेठेवर झाला. शेतीमालालाही मोठा फटका बसला. लग्नसराईत मागणी असलेला टोमॅटो प्रती कॅरेट केवळ शंभर ते दीडशे रूपया प्रमाणे विक्री होणे मुश्किल झाले होते. आता टोमॅटोने मोठी उसळी घेतली असू नटोमॅटो प्रती कॅरेट आठशेपर्यंत पोहचला आहे. 

धुळे तालुक्यात कापडणे, न्याहळोद, धमाणे, देवभाने, नंदाणे, बुरझड, लामकानी, बोरीस, मुकटी, अजंग, नेर व खेडे येथील शेतकरी भाजीपाला उत्पादनात अग्रेसर आहेत. अर्ध्या किंवा एक एकरमधूनही विक्रमी भाजीपाल्याचे उत्पादन काढण्याचे तंत्रज्ञान हस्तगत केले आहे.

टोमॅटोचे भाव आणखी वधारतील
शहादा व सुरतच्या बाजारात टोमॅटोचे भाव मोठ्या प्रमाणात वधारत चालले आहेत. गेल्या आठ दिवसात प्रती कॅरेट आठशेपर्यंत पोहचले आहेत. आगामी पंधरा दिवसांत हजारापर्यंत पोहचतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

भाव आहे तर माल नाही
सर्वच प्रकारच्या भाजीपाल्याचे दर प्रती किलो साठपेक्षा पुढे गेले आहेत. बाजारात अधिकचा भाजीपाला उपलब्ध नाही. सतत आणि अधिकच्या पावसाने भाजीपाल्याची उबवण कमी झाली. सडण्याचे प्रमाण पन्नास टक्के आहे. भाव आहे पण भाजीपाला तयार नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

लॉकडाऊनमुळे शेतीमालाचे नुकसान
शेतकऱ्यांनी एप्रिल मे मध्ये भाजीपाल्याचे विक्रमी उत्पादन काढले. लॉकडाऊनमुळे ते मातीमोल झाले. उत्पादन खर्चही निघाला नाही. उलट कर्जबाजारी होण्याची वेळ आली. भाजीपाल्यात शेळ्या व मेंढ्या यांना चराईसाठी सोडावे लागले होते.


लॉकडाउनमुळे शेतीमाल फुकटात विकावा लागला. किंबहुना उकिरड्यावरही फेकावा लागला. आता शेतीमालाला सोन्याचे दिवस आले आहेत. पण सततच्या पावसाने भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. टोमॅटोची बाग पोटच्या पोरांसम जपली आहे. ती मला निश्चितच तारणार आहे.
- संजय माळी, टोमॅटो उत्पादक शेतकरी 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT