Toranmal Hill Station
Toranmal Hill Station 
उत्तर महाराष्ट्र

तोरणमाळ हिलस्टेशनसाठी सव्वापाचशे कोटींचा आराखडा सादर

निखील सुर्यवंशी

धुळे/शनिमांडळ : राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ (जि. नंदुरबार) (Toranmal Hill Station) पर्यटन विकासाच्या (Tourism development) माध्यमातून कात टाकणार आहे. या हिल स्टेशनच्या विकासासाठी सुमारे ५१७ कोटींच्या निधीचा आराखडा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Tourism Minister Aditya Thackeray) यांना सादर झाला. त्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात शुक्रवारी बैठक झाली. त्यात त्यांनी तोरणमाळ विकास प्राधिकरणाच्या स्थापनेसाठी उचित कार्यवाही करावी, बोटींगची सुविधा दोन वर्षांत पूर्ण करावी यासह या हिल स्टेशनच्या सर्वांगिण विकासाला लवकरच चालना दिली जाईल, अशी ग्वाही शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिल्याची माहिती धुळे-नंदुरबारचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी ‘सकाळ’ला दिली.


अक्राणी तालुक्यात तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण आहे. सातपुड्याच्या पर्वतरांगेत सरासरी ४१ चौरस किलोमीटर परिसरात तोरणमाळचा विस्तार आहे. यशवंत तलाव, सीताखाई धबधबा, कमळ तलाव, श्री मच्छिंद्रनाथ गुहा, सनसेट पॉइंट या प्रेक्षणीय स्थळांसह दुर्मिळ औषधी वनस्पतींमुळे तोरणमाळ पर्यटकांना, अभ्यासकांना भुरळ घालते. तोरणमाळ सरासरी ३ हजार ३३६ फूट उंचीवर आहे. सातपुडा पर्वत रांगेतील पंचमढी, अमरकंठ पठारापाठोपाठ तोरणमाळचा क्रमांक लागतो. तेथे मुबलक निसर्गरम्य सौंदर्याबरोबरच वन्यप्राणी, वनौषधीमुळे पर्यटनाला वाव आहे.

Toranmal Hill Station



पर्यटकांना खुणावतोय तोरणमाळ
दरवर्षी उत्तर महाराष्ट्रासह राज्य, मध्य प्रदेश, गुजरातमधील सरासरी दोन ते तीन लाख पर्यटक तोरणमाळला भेट देतात. त्यामुळे पर्यटकांना अधिक चांगल्या प्रकारच्या सोयीसुविधा मिळाव्यात या हेतूने या हिल स्टेशनचा नियोजनबद्ध विकास होण्यासाठी तोरणमाळ विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. या माध्यमातून दुर्गम भागातील नागरिकांना रोजगार मिळून मजुरांचे स्थलांतरही थांबू शकेल. त्यासाठी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पर्यटनमंत्री ठाकरे यांच्याकडे विकास आराखडा सादर करत पाठपुराव्यातून बैठक नियोजित केली, असे श्री. थोरात यांनी सांगितले.

ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक
या पार्श्वभूमीवर मुंबईत सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या बैठकीत तोरणमाळ विकासाला लवकरच सुरवात करू, असे आश्वासन मंत्री ठाकरे यांनी दिले. सहसंपर्कप्रमुख थोरात, पर्यटन संचालक सावळकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य गणेश पराडके, धडगाव तालुकाप्रमुख महेशकुमार पाडवी, युवा सेनेचे पदाधिकारी योगेश पाटील व वन अधिकारी उपस्थित होते. नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मनिषा खत्री, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाप्रमुख आमशा पाडवी, डॉ. विक्रांत मोरे बैठकीस ऑनलाइन उपस्थित झाले. त्यात तोरणमाळ विकासाला दिशा देण्याचाही निर्णय झाला.

Toranmal Hill Station

तोरणमाळच्या विकासात काय-काय?
तोरणमाळचा विकास करताना रस्ते, वीज, पाणीपुरवठ्याच्या सोयीसुविधांसह ट्रेकिंग, सायकलिंग ट्रेल, यशवंत तलाव येथे वॉटर लेझर शो, तलाव सुशोभीकरण, अम्युझमेंट पार्क, रेल्वे व वॉटर राइड, पर्यटकांसाठी रिसॉर्ट, ॲडव्हेंचर गेम, रोप वे, स्काय वॉक, वन्यजीव अभयारण्य, बचत गटांना किचन शेड, आदिवासी कला व सांस्कृतिक भवन, हॉर्स रायडिंग, बेटिंग यासह ४७ प्रकारच्या सोयीसुविधा, मनोरंजनाची अत्याधुनिक साधने समाविष्ट केली जातील, असे सहसंपर्कप्रमुख थोरात यांनी सांगितले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare : "मिस्टर राज, तुम्हाला माझ्या नावाची सुपारी..." सुषमा अंधारे यांचा लाव रे तो व्हिडीओवरून हल्लाबोल

Raj Thackeray : राज ठाकरेंचा पुन्हा एकदा 'लाव रे तो व्हिडीओ', सुषमा अंधारेंचा जुना व्हिडीओ दाखवून उद्धव ठाकरेंना सवाल

Ravindra Dhangekar : भाजपकडून पुण्यात पैसे वाटल्याचा आरोप, काँग्रेस उमेदवार धंगेकरांचं पोलिस ठाण्यात धरणे आंदोलन

Loksabha election : निवडणूक किस्सा! अमिताभ बच्चन उमेदवार अन् लिपस्टिकच्या खुणा असलेल्या चार हजार मतपत्रिका...

IPL 2024 RCB vs DC : आरसीबीची विजयी पंचमी; दिल्लीच्या पराभवाने पॉईंट टेबल झालं रंजक

SCROLL FOR NEXT