accident
accident accident
उत्तर महाराष्ट्र

भरधाव ट्रॅक्टरचे चाक निघाले; बाप लेकाचा जागीच मृत्यू !

सकाळ डिजिटल टीम

नेर : शहरातील देवपूर भागात एकविरा देवी मंदिराजवळ ही दुर्दैवी घटना घडली.भरधाव वेगाने जाणारे ट्रॅक्टरचे पुढील चाक निघाल्यामुळे ट्रॅक्टर एका दुचाकीवर जाऊन धडकले.या मोठ्या अपघातात बाप-लेकराचा जागीच मृत्यू झाला.तर आई व मुलगा हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी देवपूर पोलिस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(dhule two-wheeler accident father son death)

शहरातील देवपूर भागात पांझरा नदी लगत असलेल्या शंभर फुटी रस्त्यावरून शनिवारी प्रभात नगर कडून वीर सावरकर पुतळ्याकडे भरधाव वेगात ट्रॅक्टर (एमएच 19/सी.8656) हे जात होते. ट्रॅक्टरचे अचानक पुढील चाक निघाल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ते एकवीरा देवी मंदिरा बाजूला वळाले. याच वेळी तेथून जाणाऱ्या दुचाकी (एमएच 46/एस 514) ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. या मोठ्या अपघातात दुचाकीवरील नेर येथील रहिवाशी हेमंत भगवान बोडरे वय 40 त्यांची पत्नी अनिता हेमंत बोडरे, मुलगा विवेक(साई) हेमंत बोडरे वय 9,मुलगा उत्कर्ष हेमंत बोडरे हे सर्व काही वर्षांपासून तिरुपती नगर देवपुर धुळे या ठिकाणी वास्तव्यास होते.

दुचाकीवर आपल्या घरी जात असताना या अपघातात ट्रॅक्टर खाली येऊन गंभीर जखमी झाले. त्यांना तेथील परिसरातील नागरिकांनी तातडीने देवपूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात उपचारा दरम्यान हेमंत बोडरे व विवेक(साई) बोडरे या बाप लेकराचा मृत्यू झाला.तर पत्नी अनिता बोडरे व मुलगा उत्कर्ष बोडरे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.अपघातात दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. या अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. याप्रकरणी शुभम मटकर यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 08 मे 2024

ढिंग टांग : अस्सावा सुंदर नोटांचा बंगला..!

दहावी-बारावीनंतरच करा स्पर्धा परीक्षेची तयारी

युरोपचे अवघडलेपण

SCROLL FOR NEXT