Ahirani literature 
उत्तर महाराष्ट्र

केंद्राने नव्हे थेट..युनेस्कोने घेतली अहिराणी भाषेची दखल

युनोचा एक भाग असलेली ही युनेस्को संस्था जगातील भाषांचे जतन करण्यासाठी कार्य करीत आहे. त्यासाठी युनेस्कोचे एक स्वतंत्र खाते आहे.

जगन्नाथ पाटील

केंद्र सरकारचे भारतीय बोलीभाषा संवर्धन करणारे कार्यालय बंगलोर येथे आहे. त्या केंद्राच्या अधिकारी श्रीमती काटजू आहेत. त्यांनी पहिले विश्व अहिराणी सम्मेलनाची नोंद घेतली.


कापडणे : खानदेशी अहिराणीला प्रमाण भाषेचा दर्जा (Standard language status to Ahirani) मिळावा म्हणून उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ (North Maharashtra Khandesh Vikas Mandal) व अहिराणी साहित्यिकांचा (Ahirani literature) लढा सुरु आहे. या लढ्याला पहिले यश मिळाले आहे. हा लढा युनोत पोहचला आहे. युनोच्या युनेस्कोने (UNESCO) अहिराणी भाषेची दखल घेतली आहे. तसे अहिराणीचे गौरव करणारे पत्रही पाठविले आहे. यामुळे अहिराणी भाषेला मोठा पाठबळ मिळाले असल्याचे उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील यांनी सांगितले.

केंद्र सरकारचे भारतीय बोलीभाषा संवर्धन करणारे कार्यालय बंगलोर येथे आहे. त्या केंद्राच्या अधिकारी श्रीमती काटजू आहेत. त्यांनी पहिले विश्व अहिराणी सम्मेलनाची नोंद घेतली. शासकीय पातळीवर अहिराणी भाषा कार्यक्रमाची ही पहिली अधिकृत नोंद झाली आहे. त्यांनी पहिल्या अहिराणी भाषा विश्व संमेलनातील सर्व कार्यक्रमाच्या क्लिप त्यांच्या वेब साईटवर टाकल्या. या सर्व क्लिप्स व अहिराणी भाषेची माहिती युनेस्कोकडे पाठवल्या होत्या.

युनेस्कोकडून भाषांचे जतन

युनोचा एक भाग असलेली ही युनेस्को संस्था जगातील भाषांचे जतन करण्यासाठी कार्य करीत आहे. त्यासाठी युनेस्कोचे एक स्वतंत्र खाते आहे. जे Linguapax international in official partnership with unesko (consulitative status) या नावाने ओळखले जाते.
या संस्थानी पहिल्या विश्व अहिराणी संमेलनाची संपूर्ण माहिती घेऊन त्याचा अभ्यास केला. संमेलनात सर्व ठरावांची दखल सुद्धा घेतली आहे. हा सर्व वृत्तांत त्यांनी न्यूयॉर्क मधील वृत्त पत्रात प्रसिध्दीसही दिल्याने ही भाषा असंख्य भाषा तज्ञांपर्यंत पोहचली आहे.

अहिराणी इंंडो-आर्यन भाषा


युनोस्कोच्या पत्रात नमूद केले आहे, अहिराणी ही एक इंडो-आर्यन भाषा आहे. जी मूळतः महाराष्ट्र भारताच्या खान्देश प्रदेशात बोलली जाते. त्याचा दीर्घ इतिहास आणि समृद्ध चलन असूनही, ती भारतीय बांधणीच्या भाषा अनुसूचीमध्ये समाविष्ट केलेली नाही आणि तिला कोणतेही सरकारी संरक्षण मिळालेले नाही.


अहिराणी भाषेला भारतीय भाषांच्या परिशिष्टात स्थान मिळावे म्हणून सूर केलेल्या लढाईस पहिले यश मिळालेय. याचे श्रेय या लढ्यातील सहभागी सर्व ज्ञात अज्ञात संघटना, व्यक्ती, उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ, त्यांच्या पदाधिकाऱ्याना आणि 2 कोटी अहिर बांधवांना जाते. आंतरराष्ट्रीय भाषा तज्ज्ञ पद्मश्री गणेश देवी सर यांचे विशेष आभार मानतो. त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन युनोच्या अधिकाऱ्यांशी पत्र व्यवहार केला.
- विकास पाटील, अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT