उत्तर महाराष्ट्र

दोंडाईचा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाची तोडफोड 

सदाशिव भालकार

दोंडाईचा ः येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष ॲड. एकनाथ भावसार यांचे वकील व्यवसायाच्या कार्यालयालयाचे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालयात दोन जणांनी बळजबरीने घुसून धुडगूस घालत तोडफोड केली. कार्यालयातील क्लर्क यांच्यावर लोखंडी कोयत्याने वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी पोलिस कर्मचारी पकडण्यासाठी गेले असता त्यांच्यावर ही कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी विक्की उर्फ विवेक अजय निकवाडे तसेच छोटू उर्फ दिनेश सदाशिव शिंपी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पक्षाच्या कार्यालयातील तोडफोड व झालेला हल्ला निंदनीय असून जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. 

शहरातील राम मंदिर रोडवर ॲड एकनाथ भावसार यांचा वकिली व्यवसाय व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय आहे. शुक्रवारी (ता २०) सकाळी साडेनऊच्‍या सुमारास विवेक निकवाडे व त्याचा साथीदार छोटू शिंपी मोटरसायकलने आले आणि कार्यालयात घुसले. ऑफिसचे कामकाज पाहणारे छोटू सैंदाणे याच्या डोक्यावर लोखंडी कोयत्याने वार केला. ते बघून पोलिस कर्मचारी योगेश पाटील हे कार्यालयात दोघांना पकडण्यासाठी आले असता त्यांच्यावर देखील कोयत्याने वार करण्याचा प्रयत्‍न केला. घटनेची माहिती मिळताच अॅड. एकनाथ भावसार कार्यालयात आले. तो पर्यंत दोघांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले होते. संशयित दोघांनी कार्यालयात तोडफोड केली आहे. यापूर्वी २०१९ मध्य विक्की उर्फ विवेक निकवाडे यांने आपल्या साथीदारांसह तात्कालिन न्यायाधीश यांच्या निवासस्थानी दगडफेक प्रकरणी वकीलपत्र नाकारल्याचा राग त्याच्या मनात असल्याने ते माझा शोध घेऊन ठार करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे अॅड एकनाथ भावसार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. 

राष्ट्रवादीकडून घटनेचा निषेध 
शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयावर केलेला हल्ला निंदनीय आहे. त्याचा निषेध करतो. घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी पक्षाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृह मंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन घटनेचा खोलवर तपासाची मागणी आम्ही करणार आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्‍हाध्यक्ष किरण शिंदे यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार रामकृष्ण पाटील, माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे यांनी कार्यालयातील तोडफोडीची पहाणी केली. 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DSK Case: डीएसके प्रकरणात ठेवीदारांना मोठा दिलासा; ५७२ कोटींच्या मालमत्ता लिलावाच्या अर्जावर तीन महिन्यांत निर्णय

IIT Bombay Exam: आयआयटी बॉम्बे परीक्षेत गैरप्रकार? कॉपीसाठी ७०० रूपयांच्या मोबाईलचा वापर, पोलिसांकडून तपास सुरू

इंदिरा गांधींची हत्या करणाऱ्याच्या मुलाला विधानसभेचं तिकीट, पंजाब निवडणुकीसाठी पहिला उमेदवार जाहीर

Marathi News Live Updates : मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, एक जण जखमी

Vaibhav Sooryavanshi: वय अवघं १५, संपत्ती कोट्यवधींच्या घरात! वैभव सूर्यवंशीसोबत जोडले गेले ‘हे’ ५ मोठे ब्रँड; कमाईचा आकडा ऐकून व्हाल थक्क!

SCROLL FOR NEXT